बाबरवस्ती शाळेत प्रोजेक्टरचे उद्घाटन व वह्या वाटप

0
10

जत,दि. 16:पांडोझरी येथील (बाबरवस्ती)जिल्हा परिषद शाळेत प्रोजेक्टर उद्घाटन व वह्या वाटप कार्यक्रम सरदार पाटील जिल्हा परिषद सदस्य सांगली यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हा परिषद शाळा सक्षम करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू , प्रोजेक्टर, संगणकाच्या माध्यमातून शिक्षण गतिमान व्हावे.हे गतिमान शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे.शिकणे सुलभ व्हावे.याचा फायदा ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना व्हावा.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळून विद्यार्थी सक्षम व्हावा.असे जिल्हा परिषदेचे सदस्य सरदार पाटील या प्रसंगी म्हणाले.शिक्षक -विद्यार्थी आणि पालक यांच्यात उत्कृष्ट सुसंवाद आहे.शाळेविषयी आस्था,आदर मनाला भावणारा आहे.मुलांच्या प्रगतीविषयी दिलीप वाघमारे प्रयत्न करत आहेत.त्यांचे कार्य स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे.विद्यार्थ्यांच्या ,पालकांच्या , नागरिकांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने या शाळेची प्रगती उत्तम आहे.यावेळी उपसरपंच नामदेव पुजारी,चंद्रकांत कांबळे ,मारुती बाबर,राजाराम गडदे ,शिवाप्पा कोरे,प्रकाश बाबर,कविता कोरे, शालाबाई गडदे,सविता मोटे, संखुबाई मोटे,अर्जुन मोटे,शोभा बाबर संतिश बिरादार,तुकाराम बाबर इत्यादी . प्रास्तविक व सुञसंचलन तसेच आभार शाळेतील मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी केले.