काँग्रेसने देशाला स्वातंत्राकडून सामर्थ्याकडे नेले- आमदार रामहरी रुपनवार

0
15

भंडारा,दि.16ःस्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता यांच्यावरच भारताचा पाया रचला जावा हीच काँग्रेसची धारणा होती. पारतंत्र्याच्या काळापासून या देश्याच्या जडणघडणेत काँग्रेसचाच महत्वाचा वाट आहे. आज केवळ गलिच्छ राजकारणामुळे सत्ताधारी, केवळ सत्ता टिकविण्यासाठी काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र करीत आहेत. काँग्रेसने देशाला स्वातंत्राकडून सामर्थ्याकडे नेले असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदचे आमदार मा रामहरी रूपनवार यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार भंडारा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबीरात अध्यक्षस्थानावरुन  बोलत होते.

प्रशिक्षण शिबीराचे उदघाटक माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे होते.अध्यक्षस्थानी आमदार रामहरी रूपनवार होते.तर पाहुणे म्हणून डॉ बबनराव तायवाडे, भंडारा जिल्हा प्रभारी मुजीब पठाण, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, रमेश डोंगरे, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या आकांक्षा ओला, प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव शिल्पाताई जवादे, सेवकभाऊ वाघाये, आनंदराव वंजारी, मधुकर लिचडे, जिया पटेल, प्रमोद तितिरमारे, प्रमिला कुटे, प्रेम वणवे, अखिल भारतीय स्तरावरील प्रशिक्षक लेखा नायर, इरफान खान, इरफान शेख, एड अक्षय समर्थ, सीमा भुरे, बशीर पटेल, पवन वंजारी, कैलास भगत, राकेश कारेमोरे, आवेश पटेल, धनराज साठवणे, अजय तुमसरे, दिलीप मासुरकर, शंकर तेलमासरे, भूमेश्वर महावाडे, नंदू समरित, शंकर राऊत, मकसुद पटेल, प्रभु मोहतुरे, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, मार्तंड भेंडारकर, धनंजय तिरपुडे, विशाल तिरपुडे, नूतन भोले, करुणा धुर्वे, नयनश्री येळणे, सुजाता कनपटे, आशा गिर्हेपुंजे, भावना शेंडे, भारती लिमजे, शमीमा पठाण, जयश्री बोरकर, गीता बोकडे, सीमा भोंगाडे, मीनाक्षी बोपचे, रजनी मुळे, वनिता मलेवार, लता प्रधान, तारा नागपुरे, अभिजित वंजारी इत्यादी प्रमुख उपस्थित होते. शिबिराच्या सुरवातीला काश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

शिबिराच्या प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी वर्तमान काळातील राजकीय परिस्थिति व आव्हाने यांचा मुकाबला करण्यासाठी प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे व अश्याप्रकारचे प्रशिक्षण शिबिरे पंचायत समिती, जिल्हापरिषद पातळीवर करू असे त्यांनी सांगितले, उदघाटक मार्गदर्शनात माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांनी कार्यकर्त्यांनी शिस्तीचे पालन करावे, कार्यकर्त्यांनी लोकहिताची कार्य केली पाहिजे जेणेकरून स्वतःची आणि पक्षाची ताकद वाढेल असा कानमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. सदर एकदिवशीय शिबिरात काँग्रेसचा इतिहास, नेहरूजी, लालबहाद्दूर शाश्त्रीजी,इंदिरा गांधी, आधुनिक भारताचे शिल्पकार राजीव गांधी, साठ वर्ष्याच्या सत्ताकाळातील काँग्रेसचे योगदान, काँग्रेस पक्षाची विचारधारा, निवडणुकीची तयारी, संघटन कौशल्य, सोशियल मीडिया, भाजप सरकारचे अपयश, नोटबंदी मुळे देशात बेरोजगारी वाढली, जिएसटी-गब्बर टॅक्स ची विफलता यावर माहितीपट दाखवून मार्गदर्शन करण्यात आले. मंच संचालन महेंद्र निंबार्ते आणि आभार प्रदर्शन प्यारेलाल वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता मंगेश हुमणे, शमीम शेख, आणिक जमा, प्रशांत देशकर , भूषण टेम्भूर्णे, सचिन फाले, नाहिद परवेझ, सुलभा हटवार, विवेक गायधने, भूपेंद्र साठवणे, सुनील बन्सोड, महेश साठवणे, जितेंद्र नागदेवे इत्यादींनी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.