सोमवारला जयाकिशोरी यांचा कथावाचन समारोहाचा समारोप

0
18

गोंदिया,दि.१७ः-मनोहरभाई पटेल अकादमीच्यावतीने आयोजित सुश्री जयाकिशोरी यांच्या नानी का मायरा या कथावाचन कार्यक्रमाचा समारोपत उद्या (दि.१८)सोमवारला होणार असून या कथावाचनाचा शुभारंभ दुपारी २ वाजेपासून करण्यात येणार आहे.आज रविवारल्या दुसèयादिवसाच्या कार्यक्रम शुभारंमप्रसंगी भजन सादर करण्यात आले तसेच साकेत पब्लीक शाळेचे विद्यार्थीनी अर्चिता तिवारी हिने कथ्थक नृत्य सादर करुन सर्वांचे मनमोहून घेतले.माजी आमदार राजेंद्र जैन यांनी जयाकिशोरी यांचे अभिनंदन करीत त्यांनी गोंदियात पुन्हा जनतेला आपल्या कथावाचनाचा लाभ मिळवून दिल्याबद्दल आभार मानले.
आपल्या कथावाचनप्रसंगी बोलतांना जयाकिशोरी म्हणाल्या की परमेश्वराला विसरणे ही चुक असून नेहमी सर्वांनी परमेश्वराचे स्मरण करत राहायला हवे.तसेच आपल्याला जे हवे ते परमेश्वराकडे नेहमी मागायला हवे असे सांगतच उपस्थित श्रोत्यांशी सवांद साधला.परमेश्वर अनेकदा नरqसहाला भेटायला आले तेव्हा नरqसह यांना तुळसीमाळा सुध्दा दिली तसेच त्यांच्या जिवनात मायरा भरावयास आले होते.श्रीकृष्णांने ५८ कोटीचा मायरा भरला होता त्यामुळेच या प्रसंगाला कथेचा रुप देण्यात आल्याचे जयाकिशोरी म्हणाल्या.त्यापुर्वी खासदार प्रफुल पटेल,वर्षा पटेल,राजेंद्र जैन,सुनिता जैन यांच्यासह अन्य मान्यवरांनी त्यांची आरती केली.प्रफुल पटेल यांनी यावेळी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सर्वजनतेचा सदैव आशिर्वाद मिळत असल्याचा उल्लेख करीत आपल्या जन्मदिनी हा कार्यक्रम एक योगायोग असल्याचे म्हणाले.मनोहरभाईचा जेवढा प्रेम मला मिळाला नाही त्यापेक्षा अधिक प्रेम आपला मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला.कार्यक्रमाला खासदार मधुकर ककुडे,नगराध्यक्ष अशोक इंगळे,दामोदर अग्रवाल,दिलीप बनसोड,नरेश माहेश्वरी,चेतन बजाज,सीताराम अग्रवाल,हुकुमचंद अग्रवाल,राजेंद्र माहेश्वरी,गोqवद अग्रवाल,राजनदास वाधवानी,लखीचंद रोचवानी,गोवर्धनदास चावला,इंद्रकुमार होतचंदानी,सुनिल पृथ्यानी,जय चौरासिया,कुमारभाई पलन,मनोज डोहरे,निलेश चौबे,किशोर नागदेवे,विनोद वसंतवानी,पुजा तिवारी,सुधीर बजाज,किर्ती आहुजा,चंद्रमोहन नवाल,मनिष वाधवानी,विनोद हरिणखेडे,ललिता अग्रवाल,जुगल खंडेलवाल,कुंदा दोनोडे,प्रिती अग्रवाल,गोविद येडे,राकेश ठाकुर,शकिल मंसुरी,मयुर दरबार,लालु शर्मा,राजेश वर्मा आदींसह कार्यक्रमात सहयोग करणारे स्वयंसेवक व स्वयसेवी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.