देशप्रेम, देशाप्रती निष्ठा व देशासाठी बलिदानाचा कॉँग्रेसचा इतिहास

0
12

गोंदिया,दि.१८ : महात्मा गांधी व पंडीत नेहरू आदि कॉँग्रेस नेत्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कित्येक वर्षे इंग्रजांच्या तुरूंगात काढले. इंदिरा गांधी व राजीव गांधी देशासाठी शहीद झाले. मात्र पूर्वी जनसंघ व आजच्य भारतीय जनता पक्ष आरएसएसमधील एकाही नेत्याचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही. सन १९८५ मध्ये कॉँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आत २०१९ पर्यंतच्या १३४ वर्षांत कॉँग्रेस पक्षाचा देश प्रेम, देशाप्रती निष्ठा व देशासाठी बलिदान देण्याचा स्वर्णिम इतिहास असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी (दि.१६) आयोजीत कॉँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात उपस्थित पदाधिकारी व कार्यकत्र्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी अखिल भारतीय महिला कॉँगे्रस उपाध्यक्ष आकांक्षा ओला, लेखा नायर, नैसद्ध परमार, प्रदेश महासचिव व प्रशिक्षण प्रमुख अ‍ॅड.रामहरी रूपनवर, डॉ. बबनराव तायवाडे, प्रदेश सचिव जिया पटेल प्रामुख्याने उपस्थित होते. या शिबिराचा शुभारंभ भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षाच्या ध्वजाचे रोहण करून तसेच पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यकत्र्यांशी संवाद साधला.
पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, भाजपने फक्त देशावासीयांची दिशाभूल करून सत्ता काबिज करण्याचे काम केले. एक जवानाच्या डोक्याच्या बदल्यात १० पाकिस्तान्यांचे मुंडके कलम करण्याची गोष्ट करणा?्या प्रधानमंत्र्यांच्या नजरेसमोर पुलवामा येथे जवानांना ठार करण्यात आले. तर दुसरीकडे प्रधानमंत्री निवडणूक रॅलीत व्यस्त होते. त्यांनी दोन कोटी युवांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले. मात्र आज प्रत्येकच घरात एक बेरोजगार आपल्या भविष्याची चिंता करीत बसला असून याचा जाब आता प्रत्येकच भाजपाईला विचारण्याची गरज आहे. शेजारच्या मध्यप्रदेश राज्यात सरकार धानाला २५०० हजार रूपये भाव देत असून शेतकक्तयांची कर्जमाफी केली आहे. येथे मात्र भाजप १७५० भाव देत आहे. त्याता आता प्रधानमंत्री शेतकक्तयांना ६ हजार रूपये तीन किश्तमध्ये वार्षीक देवून पुन्हा फुस लावत असल्याचे सांगीतले.
शिबिरात भारतीय कॉँग्रेस कमिटी सचिव आशिष दुआ, प्रदेश प्रवक्ता अतु लोंढे, जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा प्रभारी उमाकांत अग्निहोत्री, रामरतन राऊत, सहसराम कोरोटे, भरत बहेकार, डॉ. योगेंद्र भगत, विनोद जैन, डॉ.झामसिंग बघेले, पी.जी.कटरे, पृथ्वीपालसिंह गुलाटी, उषा सहारे, उषा मेंढे, राधेलाल पटले, रमेश अंबुले, लता दोनोडे, माधुरी हरिणखेडे, शकील मंसूरी, राकेश ठाकुर, अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर, बंसीधर अग्रवाल, अनिल गौतम, पन्नालाल सहारे, आलोक मोहंती यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.