स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप पोहाणे

0
21

नागपूर दि 20 फेब्रुवारी: महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी पूर्व नागपुरातील प्रभाग २४ मधील भाजपाचे नगरसेवक प्रदीप पोहणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. १ मार्चला विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांचा कार्यकाळ संपत आहे. तत्पूर्वी पोहाणे अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारतील.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार दरवर्षी ५० टक्के सदस्य निवृत्त होतात. सभागृहातील संख्याबळानुसार १६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपच्या कोट्यातून १२ सदस्य आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी भाजपच्या सहा व काँग्रेसच्या दोन सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर माजी महापौर प्रवीण दटके यांनी भाजपच्या कोट्यातील सर्व १२ सदस्य नवीन सदस्यांच्या नावाची घोषणा केली. यात प्रदीप पोहाणे, वैशाली रोहणकर, श्रद्धा पाठक, यशश्री नंदनवार, जगदीश ग्वालबंशी, वर्षा ठाकरे, स्नेहा बिहारी, वंदना भगत, निरंजना पाटील, संजय चावरे, लखन येरवार व विजय चुटले यांचा समावेश आहे. काँग्रेसचे दिनेश यादव व गार्गी चोपरा यांचा समावेश आहे. बसपाच्या कोट्यातील एका सदस्यांची घोषणा पुढील बैठकीत के ली जाणार आहे.
प्रारंभी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच स्थायी समितीच्या सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करून महापौर नंदा जिचकार यांनी नवीन सदस्यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करून सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. स्थगित सभा २६ फेब्रुवारीला होणार आहे.