डीपीओसह 4 अधिकार्यांवर कारवाई,जिल्हाधिकार्यांनी केले घरभाडे भत्ते बंद

0
18

गोंदिया,(खेमेंद्र कटरे) दि.20ःः-जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थानाची व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकानी निवाससोय नसल्यास घरभाडे दिले जाते. परंतु गोंदिया जिल्हा मुख्यालयातील ४ अधिकारी हे दररोज सोय उलब्ध असताना नागपूरवरून अपडाऊन करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी डाॅ. कादबंरी बलकवडे यांनी त्यांचे घरभाडे भत्ता बंद करण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ माजली आहे.अधिकारी कर्मचारी यांचे घरभाडे भत्ता बंद करण्यासाठी केलेली जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे.तर काहींचे अर्जित रजा प्रकरणही बंद केले आहे.यामध्ये जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासह नगरप्रशासन विभागाच्या प्रमुखांचा समावेश आहे.

शासन नियमानुसार अधिकारी व कर्मचारी यांना घर किराया भत्ता (एचआरए) दिले जाते. परंतु गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकारी मुख्यालयी उपस्थित न राहता अपडाऊन करतात.ज्यामुळे कार्यालयात वेळेवर पोचत नाही, हे बघून जिल्हाधिकारी डा. कांदम्बरी बलकवडे यांनी कडक़ भुमिका घेत सर्व अधिकारी व कर्मचार्यांना ऑनलाईन बायामेट्रिक उपस्थिती अनिवार्य केली होती.परंतु त्यांच्या आदेशाचेही पालन न करता सर्रास या अधिकार्यांनी उल्लंघन करीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखविली.त्यातच कार्यालयात येणारे आगंतुक यांना अधिकारी वेळेवर मिळत नसल्याने समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे लक्षात आले.त्यामुळे जिल्हाधिकारी बलकवडे यांनी याप्रकरणात नगर प्रशासन विभागाचे जिल्हा प्रशासन अधिकारी विनोद जाधव,जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती एम.ए. भुत,जिल्हा मानव विकास नियोजन अधिकारी पी.वी. बलकुंडे,सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी एस. भिमटे हे मुख्यालयी न राहता घर किराया घेत असल्याचे चौकशीमध्ये उघडकीस आले .त्यानंतर या अधिकार्यांचे घरभाडे भत्ता बंद कऱण्याचे आदेशच जिल्हाधिकारी बलकवडे यांनी दिल्याने चांगलीच खळबळ माजली. याव्यतिरिक्त २० हून अधिक अधिकारी व कर्मचारी जे शासन नियमानुसार आठ तास काम कार्यालयीन करण्यासाठी उपस्थित राहत नाही अशा कर्मचार्यांच्या सर्विस रेकार्डवरून त्यांची अर्जित रजा व शिल्लक रजा कपात करण्याच्या निर्णय घेतल्याने चांगलीच दहशत पसरली आहे.अशाप्रकारची ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई असून आजपर्यंत एकाही जिल्हाधिकार्यांने हे करण्याचे धाडस दाखविले नव्हते.