24 पोलीस अधिकारी कर्माचार्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पद्दोन्नतीपर सत्कार

0
10

गोंदिया,दि.21:- गोंदिया जिल्हा पोलीस विभागात कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचार्यांंना पदोन्नतीपर स्टार लावून पोलीस अधिक्षकांच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आले.यामध्ये 6 पोलीस हवालदार,8 पोलीस नाईक,10 पोलीस शिपायांचा समावेश आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या प्रांगणात बुधवार(दि.20)ला झालेल्या छोटेखानी समारंभात त्या सर्व पदोन्नती मिळालेल्या अधिकारी कर्मचार्यांना पोलीस अधिक्षक हरिष बैजल व गृह उपअधिक्षक सोनाली कदम यांच्या हस्ते स्टार व फित लावण्यात आले.या कर्मचारी अधिकारी यांच्या गौरव कार्यक्रमाच्या माध्यमातून इतर पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना प्रेरणा मिळावी आणि त्यांनीही चांगले कार्य करुन स्टार मिळविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याकरीता कार्यक्रमाचे आयोजन असल्याची भूमिका पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांनी व्यक्त केली.

पदोन्नती झालेल्यामध्ये पोलीस हवालदार ते सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर नत्थु डोंगरूजी मेश्राम, कमलसिंग शालीकराम सुर्यवंशी, मोतीराम मरसकोल्हे, खुशाल भस्मे, प्रीतमलाल सुरसावंत व फलेंद्र गिरी यांचा समावेश आहे.पोलीस नाईक ते पोलीस हवालदार पदावर बालाजी कोकोडे, ज्ञानेश्वर औरासे, नरेशकुमार साखरे, दशरथ मसराम, धर्मेंद्र परतेकी, रमेश बिसेन, प्रतिभा राउत, विलास घोरमारे यांचा समावेश आहे.तर पोलीस शिपाई ते पोलीस नाईक पदावर हरगोविंद उके, तुरषा लिल्हारे, सुनिलकुमार कोहळे, मकरंद मोहिते, सरोज घरडे, आशिषकुमार अग्निहोत्री, पंकज सव्वालाखे, गुलाबदास तुरकर, पुस्तकला बिसेन, संजयकुमार बेलपांडे यांचा समावेश आहे.या सर्व पदोन्नत झालेल्या कर्मचारी अधिकार्यांना एकवेतनवाढ अधिकची मिळणार असून तपासामध्ये सुध्दा अधिकचे अधिकार मिळाले आहेत.कार्यक्रमाला पोलीस निरिक्षक चांदा, पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे,ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरिक्षक नारनवरे यांच्यासह कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.