शहारवाणी शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

0
20

गोरेगाव,दि.28ःः तालुक्यातील स्व. ब्रीजलालजी कटरे हायस्कूल शहारवानी येथील इयत्ता १०वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष खेमचंदजी मेश्राम होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तंटामूक्ती अध्यक्ष सुरेशकूमारजी मेश्राम, माजी प. स. सभापति महाराजसींग कोडापे, से. नी. मुख्याध्यापक  एच. बी. पटले, ग्रा. प. सदस्य  सूनंदाताई मेश्राम,  सुरेश बिसेन,मुख्याध्यापक  आर. वाय. कटरे हे होते.कार्यक्रमाचे संचालन कू. पौर्णिमा ठाकरे आणि आभार प्रदर्शन ललित पटले यांनी केले.याप्रसंगी शालेतील सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.वर्ग 10वी च्या विद्यार्थींनी मनोगत व्यक्त केले तर सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले