अर्जुनी/मोर पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय ईमारतीचे भूमीपूजन ३ मार्चला

0
12

अर्जुनी/मोर,दि.01 मार्चः-गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोर पंचायत समिती नविन प्रशासकीय ईमारत बांधकामाचे भूमीपूजन कार्यक्रम रविवार 3 मार्च रोजी दुपारी 12 वाजता पंचायत समितीच्या आवारात पालकमंत्री तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या  हस्ते  करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष सीमाताई मडावी राहणार आहेत. तर विशेष अतिथी म्हणून राज्य सभा सदस्य प्रफुल्ल पटेल,खासदार मधुकर कुकडे, विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके,जिल्हा परिषद ऊपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबर अली,समाज कल्याण सभापती विश्वजित डोंगरे, महिला व बालकल्याण सभापती लताबाई दोनोडे,शिक्षण सभापती रमेश अंबुले,क़ुषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने, जिल्हाधिकारी डॉ कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी,पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर,उपसभापती करुणाताई नांदगावे तसेच अर्जुनी/मोर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत.