राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या धसक्याने तेंदुपत्ता बोनस मिळाला

0
17

अर्जुनी-मोरगाव,दि.03 : ४२ गावातील 3573  तेंदूपत्ता कामगारांचे बोनस २ कोटी ६ लाख 26 हजार 495 रुपये  न मिळाल्याने लाभधारकांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने वनविभागाविरुध्द आंदोलनाचा इशारा दिला होता.अखेर त्या आंदोलनाचा धसका घेत प्रशासानाने तेंदूपत्ता संकलन केंद्रावरील लाभधारकांच्या बोनसचे आदेश काढून वाटप प्रक्रिया सुरु केली.
अर्जुनी-मोरगाव वनक्षेत्र कार्यालयांतर्गत ४२ गावातील ३५७३ तेंदूपत्ता लाभधारकांचे गत दोन वर्षापासून २ कोटी ६ लाख रुपये थकीत होते. बोनसच्या प्रतिक्षेत प्रदीर्घ कालावधी निघून गेल्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष विप्पल बरैय्या यांनी वरिष्ठांना पत्र देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर वनविभागाने जागे होत वडेगाव, खामखुर्रा येथील लाभधारकांना बोनसचे वितरण करण्यास सुरवात केली. उर्वरित गावातील लाभधारकांचे धनादेश काढण्यात आले असून त्याची वितरण प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले यांनी सांगितले.
खामखुर्रा येथील धनादेश वितरणप्रसंगी वनपाल प्रविण केळवतकर, निप्पल बरय्या, अरविंद खुणे, क्रिष्णा पारधी, अशोक ठाकरे, मनोहर सोनवाने, भूकेश गजापुरे, टेकचंद जांभुळकर, कनिराम नंदेश्वर, ज्ञानेश्वर मिसार, जनार्धन कोड्डे, बळीराम दूनेदार, शामराव ठाकरे, प्रशांत जांभुळकर, परसराम जांभुळकर, महादेव जांभुळकर, प्रफुल बडोले व गावकरी उपस्थित होते.