जिल्ह्याला अकाली पावसाने झोपडले

0
15

गोंदिया,दि.03 : रविवारी पहाटे अचानक जिल्ह्यात गारांसह पाऊस  बसरला असून या अवकाळीने जिल्ह्याला झोडपून काढले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे काही नुकसान झाले नसले तरीही रब्बी पिकांसाठी हा पाऊस धोकादायक ठरला आहे. जिल्ह्यात २८४.२ मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.रविवारी आलेल्या वादळी वारा व पावसामुळे आमगाव तालुक्यातील ग्राम भालीटोला येथील शेतकरी श्रीराम लाडकू यांच्या गोठ्यातील लोखंडी छत उडाले. यात त्यांचे २ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळाली अशी त्यांची मागणी आहे.
शनिवारी (दि.२) पावसाचा अंदाजही दिसत नसताना रविवारी (दि.३) पहाटे मात्र पावसाने हजेरी लावली.गोंदिया, देवरी व सडक-अर्जुनी तालुक्यात दमदार पाऊस बरसला आहे. या पावसामुळे जिल्ह्यात मालमत्ता किंवा जिवीतहानी झालेली नाही. मात्र शेतात असलेल्या चना, गहू व अन्य पिकांना या पावसाचा फटका बसला.आंब्याचा मोहरही मोठ्या प्रमाणात झडल्याने आंबा उत्पादनवरही परिणाम पडणार आहे. रविवारी जिल्ह्यात २८४.२ मीमी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची ८.६ एवढी सरासरी आहे.यात गोंदिया तालुक्यात सर्वाधीक ८२ मीमी पाऊस बरसल्याची नोंद आहे. तर सर्वात कमी पाऊस गोरेगाव तालुक्यात बरसला असून १८.२ एवढी नोंद घेण्यात आली आहे. शिवाय अर्जुनी-मोरगाव तालुक्यात पावसाची नोंद घेण्यात आलेली नाही.