विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य असेल तरच कौतुक होईल : राजेंद्र जैन

0
17

गोंदिया,दि.04 : २१ व्या शतकात तंत्रज्ञानाच्या विकासाचा झपाटा बघता, विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन कौशल्य असेल तरच त्यांचे कौतुक होईल, नवीन कौशल्य जीवनाला नवीन उजाळा देण्याचे काम करीत असते, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी व्यक्त केले.एम.जी. पॅरामेडिकल डीएमएलटी कॉलेज मुर्री येथे वार्षिक संमेलनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना जैन बोलत होते. कार्यक्रमाला मनोहर वालदे, नगरसेवक विनीत सहारे, जितेश राणे, युरो सर्जन डॉ. नोव्हिल ब्राम्हणकर, डॉ . सुवर्णा हुबकेर, राजेंद्र गोंडाणे,अनिल गोंडाणे आदी उपस्थित होते. मागील वर्षी डीएमएलटी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राज्यातून प्रथम आल्याबद्दल ललित ढबले यांचा सत्कार मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. विनायक रूखमोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्य सादर केले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले, व्यवस्थापक सुनंदा बिसेन, धनराज बनकर, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. कृष्णा मेश्राम, डॉ. स्मिता गेडाम, अवंतीबाई लोधी, शिव नागपुरे, आंबेडकरी चळवळ संस्कार केंद्राचे महेंद्र कठाणे, अतुल सतदेवे, संजू खोब्रागडे, पौर्णिमा नागदेवे, अल्का मेश्राम, दीपक बहेकार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विक्रांत चौधरी, प्रदीप ढोपे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले..