महिलांनी आपली शक्ती ओळखून प्रगती करावी : सौ. वर्षा पटेल

0
21

तिरोडा,दि.05 : महिलांनी येणार्या निवडणुकीत जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्यासाठी जागरुक रहावे, मतदानाचे महत्व जाणून घ्यावे, आपला संकल्प आहे की, महिला, शेतकरी व युवा वर्गाने जीवनात समोर जावे व क्षेत्राच्या विकासाकरिता आपले योगदान द्यावे,महिलांनी आपल्या शक्तिला आळखावे व येणार्या समस्यांवर मात करून यशस्वी व्हावे, असे मत मनोहरभाई पटेेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्षा सौ. वर्षाताई पटेेल यांनी व्यक्त केले.त्या उदघाटक म्हणून बोलत होत्या.यावेळी त्यांच्या हस्ते विविध कामाचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

ते तिरोडा विधानसभा क्षेत्रातील अर्जुनी येथील उच्च माध्यमिक शाळा येथे आयोजित महिला मेळाव्याला मार्गदर्शन करतांनी बोलत होत्या. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर होत्या.प्रमुख अतिथी म्हणून तिरोडा प.स. सभापती निता रहांगडाले, जि.प.सदस्य सुनिता मडावी, जि.प. सदस्य विणाताई बिसेन, जि.प.सदस्य प्रितीताई रामटेके, पं.स. सदस्य उषाताई किंदरले,मायाताई  शरणागत,जयाताई धावडे,संध्याताई गजभिये, नत्थु अबुंले,सरपंच माया भगत,सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.सौ. पटेल पुढे म्हणाल्या की महिला लघु उद्योगामध्ये उत्पादन वाढविण्यासाठी निरतंर आपले योगदान देत आहेत, शेतात धान्य पिकण्यासाठी महिलांची प्रमुख भूमिका असते, आरोग्य व प्रसूतीला घेऊन महिलानीच आपली सार्थक भूमिका दर्शवितात तसेच अन्य क्षेत्रातही महिलानी आपले सामर्थ दाखविलेले आहे, असे त्या म्हणाल्या.