बळीराज्याचे प्रश्न सोडविण्यासाठी बळीराज्याचीच सत्ता हवी-डॉ.धावडे

0
31

तुमसर,दि.०५ः-ओबीसी सेवा संघ व बळीराजा महोत्सव समिती भंडाराच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे बाबा जन्मोत्सव सोहळा येथील रायबहादूर प्राथमिक शाळेच्या पटागंणावर उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळीराजा महोत्सव समितीचे अध्यक्ष सदानंद इलमे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून बळीराजा पक्षाचे संस्थापक डॉ.महेंद्रकुमार धावडे,विदर्भ राज्य स्वराज आंदोलनाचे अध्यक्ष उत्तमबाबा सेनापती,गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलु कटरे,भंडारा जिल्हा ओबीसी सेवा संघ अध्यक्ष गोपाल सेलोकर,नरेंद्र पालांदूंरकर,श्रीमती प्रधान,श्रीमती पांडे,डॉ.कोडवाणी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षस्थानावरुन बोलतांना डॉ.धावडे म्हणाले की,बळीराजाच्या राज्यात संपूर्ण जनता सुखी व समृद्ध होती. म्हणून बळीराज्याच्या हजारो वर्षानंतरही आपण म्हणतो की ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो‘.बळीराज्याचे(शेतकरी)प्रश्न सोडवायचे असतील तर बळीराजाचीच सत्ता असावी लागेल कारण कोणतीही सरकार बळीराजाचे प्रश्न सोडवू शकत नाही.
तर यावेळी बोलतांना बबलु कटरे म्हणाले की,ओबीसी समाजाच्या दुर्दशेला ओबीसी वर्गातील स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारे लोक कारणीभूत आहेत.अश्या लोकांनी त्यांच्या पोटाचा प्रश्न सुटल्यामुळे समाजाकडे पाठ फिरविली आहे.ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात शेती करतो आज कधी नव्हे एवढ्या माझ्या शेतकèयाच्या आत्महत्या होऊन सुद्धा न जागणारे ओबीसी आपल्या भविष्यात होणार असलेल्या दुर्दशेचीच वाट पाहत असल्याची खंत बोलून दाखविली. उत्तम बाबा म्हणाले की आपल्या समस्या सोडविण्यासाठी विदर्भ राज्य वेगळा होणे गरजेचे आहे. डॉ. कोडवाणी म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांचा आदर्श घेऊन आपल्या समाजाला पुढे चालावे लागेल.तर अध्यक्षीय भाषणात सदानंद इलमे यांनी आपल्या समाजातील लोकांनी इतर पक्षांचे झेंडे उचलण्यापेक्षा त्या लोकप्रतिनिधिंना आपल्या समस्येबाबद प्रश्न विचारण्याची वेळ आल्याचे सांगितले.कार्यक्रमाच्या प्रास्तविकात गोपाल सेलोकर म्हणाले की ओबीसी लोकांनी ओबीसी सेवा संघाशी जुडून ओबीसी लोकांसाठी काम करावे. इतर समाजाच्या संघटना जशा प्रभावीपणे काम करतात त्याच प्रमाणे बहुसंख्य असलेला आपला ओबीसी समाज एकत्र आल्यास स्वतःचीच काय तर संपूर्ण देशाची दशा व दिशा बदलवू शकतो.सूत्रसंचालन डॉ. आशिष माटे तर आभार डॉ. शैलेश कुकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन गायधने, प्रशांत सेलोकर, राकेश धार्मिक , योगेश बोरकर, प्रफुल्ल पटले, कैलास तितिरमारे, निलेश मेटे, गिरीश गडेरिया, इ. लोकांनी सहकार्य केले.