महात्मा फुले यांचा पुतळा पूर्ववत ठेवा

0
17

भंडारा,दि.६ ःःप्रभाग क्र. २ भगतसिंग वार्डनवीन टाकळी येथभल महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा नगरपालिकेने हटवून बळजबरीने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. सदर पुतळा पूर्ववत ठेवण्यात यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
म. फुलेंचा पुतळा हटविणे त्यांचा अपमान आहे. लवकरात लवकर नगर पालिकेला जिल्हा प्रशासनाने आदेश देऊन अतिक्रमण हटविण्यात यावे, त्यांचा पुतळा पुर्नस्थापित कर्‍यात यावा, तसेच म. फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
निवेदन देताना खा. मधुकर कुकडे, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, महेंद्र गडकरी, तालुकाध्यक्षनरेंद्र झंझाड, डॉ. रविंद्र वानखेडे, धनेंद्र तुरकर, नितीन तुमाने, यशवंत सोनकुसरे, सुमेध श्यामकुंवर, स्वप्निल नशिने, सुमित घोगरे, बाळा गभने, राजू हाजी सलाम, सुनिल रामटेके, हिमांशू मेंढे, सोनू कनोजे, प्रा. राजपूत, सुनिल शहारे, उमेश ठाकरे, सुनिल साखरकर, भानुदास बनकर, अमर उजवणे, अहुजा डोंगरे, किशो इंगळे, महेश गजनाडे, सरिता मदनकर, छाया गभने, मंजुषा बुरडे, हर्षा वैद्य, अरूण अंबादे, नितेश फुलेकर, ईश्‍वर कळंबे, दयानंद नखाते उपस्थित होते.