संविधानाच्या संरक्षणासाठी संघटना रस्त्यावर,सरकारचा नोंदवला निषेध

0
22

नागपूर/भंडारा/गोंदिया,दि.06ःः संविधानाच्या संरक्षणासाठी संविधान बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात १८५ संघटनांनी एकत्र येऊन रॅली काढली. संविधान चौकात रॅली पोहचल्यानंतर सायंकाळी प्रातिनिधिक स्वरूपात ईव्हीएम जाळण्यात आली.भंडारा संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रव्यापी बंद निमित्ताने भंडारा येथे मंगळवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले. येथील त्रिमूर्ती चौकात अनेकांनी अटक करवून घेतली.गोंदिया येथील ड़ाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सविंधान बचाव संघर्ष समिती,ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ,बहुजन युवा मंचच्या पदाधिकार्यानी एकत्रित येत नारेबाजी केली.यात अतुल सतदेवे,कैलास भेलावे,पोर्णिमा नागदेवे,सुनिल भोंगाडे,रवी भांडारकर,शिव नागपूरे आदींचा समावेश होता.
विद्यापीठांमध्ये २०० पॉईंट रोस्टर सिस्टमच्या जागेवर १३ पॉईंट रोस्टर सिस्टम लागू केल्याच्या विरोधात देशातील दलित व आदिवासी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले होते. नागपुरात संविधान बचाओ संघर्ष समितीच्या नेतृत्वात भीम चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये ३०० दुचाकी होत्या. विविध रंगांचे झेंडे घेऊन विविध संघटनांचे कार्यकर्ता रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीमध्ये ईव्हीएम हटाव देश बचाव, १३ पॉईंट रोस्टर बंद करा, १० टक्के सवर्ण आरक्षण रद्द करा, आदिवासींना विस्थापित करू नका, ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, आदी मागण्यांसाठी नारे-निदर्शने करण्यात आली. संविधान चौकात रॅली पोहचल्यानंतर प्रा. बी.एस. हस्ते, अ‍ॅड. संदेश भालेकर, विक्की बेलखोडे, धर्मेश सहारे, व डॉ. सुनील पेंदोर यांनी मार्गदर्शन केले. प्रधानमंत्र्यांची खोटी आश्वासने, खोटे दावे यामुळे जनतेला रस्त्यावर उतरावे लागत आहे. ईव्हीएमच्या बाबतीत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे.

संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने नऊ मुद्यांवर संपूर्ण देशभर आंदोलन केले. त्यानिमित्त भंडारा येथेही आंदोलन करण्यात आले. सकाळी भंडारा शहरातून रॅली काढण्यात आली. तर सायंकाळी ५ वाजता येथील त्रिमूर्ती चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी अचल मेश्राम, सुनील चवळे, हर्षिला गराडे, सुषमा शहारे, वैशाली डोंगरे, विजयकांत बडगे, किशोर मेश्राम, धर्मेंद्र मेश्राम, रामकृष्ण नगरे, बळीराम सार्वे, रामदास मेश्राम, चिंतामण वाघमारे, निखील राऊत, रुपचंद डोंगरे, धर्मदास गणवीर, कृपालम बागडे, भोजराज जनबंधू, नाशिक रामटेके, राजेश बन्सोड, गणेश धांडे, ओमराज बांते, कार्तीक वडस्कर आदींनी अटक करवून घेतली. यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.