श्रमयोगी योजनेतून लागणार पैसे बचतीची सवय

0
17

भंडारा,दि.६ : केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या वतीने ^६० वर्ष वयानंतर असंघटीत कामगारांना मिळणाऱ्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन निवृत्ती वेतन योजनेच्या माध्यमातून गरीब कुटूंबांना पैसे बचत करण्याची सवय लागणार असून भविष्यात हया योजनेतील पैसाचा फायदा कुटूंबांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी होईल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.

केंद्र सरकारच्या वतीने अर्थ संकल्पात ६० वर्ष वयाच्या असंघटीत कामगारांसाठी मासिक तीन हजार रुपए निवृत्ती वेतनाची हमी देणारी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन निवृत्ती वेतन योजनेची घोषणा करण्यात आलेली होती, हया योजनेचा शुभारंभ मंगळवारला करण्यात जिल्हा परिषद सभागृहात करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. अवघ्या काही दिवसातच या योजनेसाठी भंडारा जिल्हयात आठ हजार लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून ही नोंदणी प्रक्रीया अशीच सुरू ठेवून नागरिकांना पेन्शन मानधन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सीएससी व आपले सरकार सेवा केंद्राचे माध्यमातून आयोजित कार्यक्रमाला यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बागडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य) मंजूषा ठवकर, प्रवर्तन अधिकारी (भविष्य निर्वाह निधी) अमित आहूजा, संतोष पोळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) मनिषा कुरसंगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी पाच्छापूरे, जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी नितीन फुके, उप कार्यक्रम व्यवस्थापक खोब्रागडे, आपले सरकार केंद्र (पंचायत) जिल्हा व्यवस्थापक निकेशकुमार पटले आदींची उपस्थिती होती.