आ.अग्रवालांच्या १० वर्षाच्या संघर्षाला यश,संजयनगर झुडपी जंगलातून मुक्त

0
16

गोंदिया,दि.०६ःः गोंदिया नगरपरिषदेंतर्गत येत असलेल्या संजयनगर व गोqवदपूर भागातील ६.५३ हेक्टर जमिनीला ५ मार्च रोजी भारत सरकारच्या पर्यावरण व वनविभागाने झुडपी जंगलाच्या अटीतून मुक्त करण्याचे आदेश निर्गमित केल्याने या परिसरातील ६०० पेक्षा अधिक कुटुंबाना स्थायी जमिनीचे पट्टे मिळण्याचे मार्ग मोगळा झाला आहे.गोंदिया मतदारसंघाचे आमदार व राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांनी यासाठी गेली १० वर्ष सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवलेला होता.आ.अग्रवालांच्या पाठपुराव्यामुळेच केंद्रीय पर्यावरण,वन व जलवायू मंत्रालयाचे मंत्री हर्षवर्धन यांनी सदर प्रश्न निकाली काढला आहे.गेल्या ८-१० वर्षापासून सदर जागेवर निवासास असलेल्या संजयनगर व गोंविदपूरवासियांना या जमिनीचे हक्काचे पट्टे मिळावे यासाठी आ.अग्रवाल प्रयत्न करीत होते.त्यातच सदर जागा नगरपरिषदेने खेळाचे मैदान व बगीच्यासाठी आरक्षित केली होती.तर महसुल विभागाच्या रेकार्डनुसार सदर जागा झुडपी जंगलात मोडत होती.त्यामुळे या भागातील नागरिकांना स्थायी पट्टे मिळण्यात अडचणी जात होत्या.त्यामुळेच २०१३ मध्ये नगरपरिषदेच्या खेळ मैदान व बगीच्याचे असलेले आरक्षण हटविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करुन त्यातून मोकळे केले.परंतु झुडपी जंगल हे शब्द रेकार्डवर असल्यामुळे अडचणी जात असल्याचे लक्षात येताच स्थानिक महसुल विभागाच्यावतीने अहवाल तयार करुन ३१ ऑक्टंोबर २०१८ ला केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते,त्या प्रस्तावाला आ.अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे ५ मार्च रोजी मंजुरी देत झुडपी जंगलातून मुक्त करण्यात आल्याने या भागातील रहिवास्यांना आता स्थायी पट्टे आचारसqहता संपल्यानंतर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिली आहे.पट्टे मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याबद्दल आमदार अग्रवाल यांचे नगरसेवक दिपिका देवा रुसे,नगरसेवक भागवत मेश्राम यांच्या नेतृत्वात परिसरातील जनतनेने त्यांचे अभिनंदन केले आहे.तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक चौधरी,नप गटनेता शकिल मंसुरी,राकेश ठाकूर,महेंद्र पुरोहित,सुनिल तिवारी,सुनिल भालेराव,निर्मला मिश्रा,व्यकंट पाथरु,पराग अग्रवाल,क्रांतीकुमार जायस्वाल यांनीही अभिनंदन केले आहे.