साडे चार लाखाचा बिल भरणा न केल्याने दुरसंचार सेवा ठप्प

0
14

गोंदिया,दि.06ः- भंडारा जिल्हा दुरसंचार विभागातंर्गत येत असलेल्या गोंदिया या जिल्हा मुख्यालयातील सुमारे 900 टेलीफोन संच असलेला दुरसंचार केंद्राने गेल्या दोन महिन्याचे विद्युत देयके न भरल्यामुळे विद्युत विभागाने विज पुरवठा खंडीत केल्याने गेल्या 4 दिवसापासून दुरसंचार सेवा ठप्प पडली आहे.बालाघाट मार्गावर असलेल्या या दुरसंचार केंद्रातून गोंदियाच्या एका भागात दुरसंचार सेवा दिली जाते.या भागात अभियंात्रिकी महाविद्यालय,विज्ञान महाविद्यालय,आर्युवैद महाविद्यालय,वन्यजिव विभागाचे कार्यालय,बँका,एसटी महामंडळासह आदी विविध शासकीय कार्यलये आहेत.त्यासोबतच खासगी टेलीफोन कनेक्शन पुरविले गेले आहेत.गेल्या काही महिन्यापासून या दुरसंचार केंद्रातून टेलीफोनधारकांना सेवा व्यवस्थित मिळत नव्हती.तर 400 च्या जवळपास असलेल्या ब्रांडबँड धारकांना स्पीडही मिळत नव्हती.त्यातच गेल्या 1 मार्चपासून विद्युत वितरण कंपनीने विज बिलाचे साडेचार लाख रुपये दुरसंचार विभागाने न भरल्याने विज पुरवठा खंडीत करण्यात आल्यामुळे या भागातील टेलीफोन सेवा पुर्णत विस्कळीत झालेली आहे.यासंदर्भात या दुरसंचार केंद्राच्या अधिकारी सुधा गजभिये यांना विचारणा केली असता त्यांनी मुख्य कार्यालयाला याबाबत माहिती देण्यात आलेली असून टेलीफोनसेवा पुर्ववत होण्यास किमान एकआठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.