जागतीक महिला दिनानिम्मित भव्य मोटार सायकल रॅली चे आयोजन

0
18

गोंदिया:दि. ८ मार्च:– जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया; जिल्हापरिषद, गोंदिया; महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) गोंदिया आणि विविध शासकीय विभाग व महिला सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ जागतीक महिला दिनङ्क निम्मित ८ मार्च २०१९ ला भव्य मोटार सायकल रॅली चे आयोजन करण्यात आलेले आहे. यारॅली मध्ये १५० महिला मोटार सायकल सह सहभागी होणार असुन महिला सशक्तीकरण, सुरक्षितता, मतदान जागृती व प्लास्टिक बंदी या संदेशाने रॅलीचे आयोजन करण्यात आले असुन रॅलीचे उदघाटन मा. डॉ. कादंबरी बलकवडे जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या शुभहस्ते, मा. डॉ. राजा दयानिधी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद , गोंदिया; मा. विनिता शाहू पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या प्रमुख उपस्थितीत मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.सदरमोटार सायकल रॅली सकाळी ०८.३० वा. पासुन ११.०० वा. पर्यंत; मार्ग – नेहरू चौक पासुन सुरुवात होऊन, मामा चौक, गोविंदपूर दुर्गा चौक, मनोहर चौक, जयस्तंभ चौक, गांधी प्रतिमा, गोरेलाल चौक, नेहरू चौक येथे समाप्त होणार आहे.