जनसुविधेची 60 लाखाची कामे,पदाधिकारी अनभिज्ञ?

0
11

गोंदिया,दि.07ःः गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये सद्या मार्चंएंडीगच्या नावावर सर्व प्रशासकीय कामे आटोपण्याचा सपाटा सुरु आहे.त्यातच समाजकल्याण विभागासाठी 9 कोटी रुपयाची कामे मंजुर झालेली आहेत,परंतु त्या कामांना अद्यापही प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याची चर्चा सुरु असतानाच जिल्हा परिषदेच्या आवारात नवीनच चर्चा एैकायला आली ती म्हणजे जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्यांनी गावांची नावे दिलेली जनसुविधेच्या कामाची यादीला मंजुरी मिळण्याएैवजी नवीनच काम असलेल्या सुमारे 60 लाख रुपयाच्या कामाच्या यादीने चर्चा गरम झाली आहे.या यादीवरुन भाजप-काँग्रेसमधील युतीचे खटकेही चांगले उडत आहेत.पदाधिकारीच एकमेकांना विचारत बसले त्यातच मला काहीच माहीत नाही असा सुरही पदाधिकार्यांच्या तोंडून निघत असल्याची चर्चा आहे.जनसुविधेच्या यादीबद्दल पंचायत विभाग,नरेगासह सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकार्यानाही विचारण्यात आल्याचे बोलले जात असून त्यांनीही आपल्या कानावर हात ठेवले तर एका वरिष्ठ अधिकार्यांनी तुम्हीच नावे दिली असतील असे बोलल्याचे वृत्त आहे.या सर्व बाबीचा आढावा घेतल्यानंतर या जनसुविधेच्या यादीमध्ये बांधकाम विभागाच्या प्रमुख असलेल्या अधिकार्याचा व त्यांच्या वरिष्ठाचा हात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.सध्या नियमित न बसणारे पदाधिकारीही गेल्या दोन दिवसापासून जिल्हा परिषदेत दुपारपासूनच आपल्या कार्यालयात विकास कामांचा आढावा घेतांना दिसून येत आहेत.बुधवारला तर रात्री 8 वाजेपर्यंत विकासाचा आढावा चालला तर आज गुरुवारला सुध्दा 12 वाजेपासूनच अधिकारी व पदाधिकारी यांच्या विकासनिधी व कामवाटपाच्या मुद्यांना घेऊन गुप्तगू सुरु असल्याचे दिसून येत होते.समाजकल्याण विभागाला 9 कोटीची कामे मंजुर झाली असून त्या कामांची यादीच अद्याप फायनल न झाल्याने प्रशासकीय मान्यता आचारसहिंतेपुर्वी मिळते की नाही यासाठी जिल्हा परिषद सदस्यही चितेंत दिसून येत होते.