महिला मोटार सायकल रॅलीला जिल्हाधिकारीसह एसपींनी दाखविली झेंडी

0
15

गोंदिया ,दि.८ःः जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हापरिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि विविध शासकीय विभाग व महिला सामाजिक संस्थाच्या संयुक्त विद्यमाने जागतीक महिला दिनानिम्मिताने आज ८ मार्चला नेहरु चौक परिसरात आयोजित कार्यक्रमातून भव्य महिला मोटार सायकल रॅलीला जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी दाखविली हिरवी झेंडी.यावेळी जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे,जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता शाहू,कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने,माजी सभापती भावना कदम,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.राजा दयानिधी,जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.श्याम निमगडे,वैद्यकिय महाविद्यालय अधिष्ठाता डाॅ.रुखमोड़े,जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.मोहबे,माविमचे सुनिल सोसे,राजगिरी बहुउद्देशिय संस्थेच्या रजनी रामटेके,बाजपेयी ड्रायव्हींग स्कुलचा लता बाजपेयी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.महिला दिनानिमित्त शहरातील जनतेसोबतच महिलांना हेल्मेट वापराचा संदेश देण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. कादबंरी बलकवडे व  पोलीस अधीक्षक वनिता शाहू यांनी स्वतः हेल्मेटचा वापर करीत रॅलीत मोटारसायकलने सहभागी झाल्या.या रॅली मध्ये 300 महिला मोटार सायकलसह सहभागी झाल्या होत्या.महिला सशक्तीकरण, सुरक्षितता, मतदान जागृती व प्लास्टिक बंदी हा संदेश रॅलीच्या माध्यमातून शहरात देण्यात आला. रॅली नेहरू चौक मार्गे मामा चौक, गोविंदपूर दुर्गा चौक, मनोहर चौक, जयस्तंभ चौक, गांधी प्रतिमा, गोरेलाल चौक मार्ग भ्रमण करीत नेहरू चौकात पोचणार आहे.