महिला दिनानिमित्त मासिक पाळी दिनदर्शिकेचे विमोचन

0
27

गोंदिया,दि.08ः- जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात आज 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महिलांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या मासिक पाळी व्यवस्थापन दिनदर्शिकेचे विमोचन जिल्हा परिषद अध्यक्षा  सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. तत्पुर्वी जागतिक महिला दिनानिमित्त ध्वजारहोण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.ई.ए. हाशमी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य नरेश भांडारकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता राजेश राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण तुषार पौनीकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी झामसिंह टेंभरे उपस्थित होते.यावेळी पाहुण्यांनी उपस्थित जिल्हा परिषदेतील महिला कर्मचार्यांना मार्गदर्शन केले. प्रास्तविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार पौनिकर व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन जिल्हा व्यवस्थापक अर्चना वानखेडे यांनी केले. संचालन कुलदिपीका बोरकर यांनी तर आभार विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे यांनी मानले.

आमगावःः तालुक्यातील ग्राम पंचायत तिगाव येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरेंद्र शिवणकर (सरपंच) हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अजय बिसेन,माजी सरपंच अंजूताई बिसेन,ग्रामपंचाय सदस्य हेमंत शेंडे,नमिताताई बघेले,शिसुलाताई शिवणकर,वंदनाताई मेश्राम,छायाताई डोंगरे उपस्थित होते.यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.ग्राम पंचायत तिगावं येथे जन्मलेल्या पौर्णिमा पवन जगणे यांच्या जुडवा मुलींना ग्राम पंचायत कडून भेट वस्तू देण्यात आली.