शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यावरून वाद; दगडफेकीत एसडीओ, तहसीलदार जखमी

0
24

बुल़डाणा(विशेष प्रतिनिधी)दि.08ः-जागतिक महिला दिनीच शहरानजीकच्या डोंगरखंडाळा येथे अनधिकृतरित्या उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यासाठी आज शुक्रवारला(दि.8) गेलेल्या पोलिसांवर ग्रामस्थांनी दगडफेक केल्याने उपविभागीय अधिकारी सुहासिनी गोणेकर, तहसीलदार सुरेश बगळे यांच्यासह २२ जण जखमी झाल्याची घटना घडली.संतप्त ग्रामस्थांनी चिखलीकडे जाणाºया बसमधील प्रवाशांना उतरवून बस पेटवून दिली. तसेच महसुल व पोलिस प्रशासनाच्या एकून सहा वाहनांचीही तोडफोड केली. नजीकच्या वरवंड या गावात रास्ता रोको करणाºया ग्रामस्थांपैकी २२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान,गावात शांतता समितीची बैठक पार पडली असून गावकºयांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. आमदार हर्षवर्धन सपकाळ,बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड यांच्यासह मान्यवरांनी गावकºयांना शांततेचे आवाहन केले.

शिवाजी महाराजांचा पुतळा ग्रामपंचायतच्या इमारतीत हलविण्यात आल्यानंतर तणाव मावळल्याची माहिती पोलिस अधिक्षक दिलीप भूजबळ पाटील यांनी दिली.येथून जवळच असलेल्या डोंगरखंडाळा येथे ग्रामस्थांनी कोणतीही परवानगी न घेता छ. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारीवरून शुक्रवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात पुतळा हटविण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस व बांधकाम विभागाच्या कर्मचाºयांवर प्रचंड दगडफेक केली.
जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. काही काळ या भागात अघोषित संचारबंदीसारखी स्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्यासह अधिकारी डोंगरखंडाळा येथे तळ ठोकून आहेत.