स्ञियांविषयी आदर दैनंदिन व्यवहारात आचरणात आणा : इंजी. दयाल भोवते

0
18
लाखांदूर,दि.08 :आज स्ञी अनेक क्षेञात अग्रेसर आहे. त्यां कुटूंब सुखी करण्यासाठी स्ञी ही पुरूषांच्या बरोबरीने संसाराचा गाडा पुढे नेत असून महिला दिन फक्त एक दिवस साजरा करण्याऐवजी स्ञियांविषयी आदर, सन्मान प्रत्येकाने दैनंदिन व्यवहारात आचरणात आणायला हवा असे प्रतीपादन इंजी. दयाल भोवते यांनी केले.ते लाखांदूर येथे आयोजीत जागतिक महिला दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
मिशन अधिकारी स्पर्धा परीक्षा केंद्र लाखांदूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.प्रास्ताविक अमित मेंढे यांनी केले.८ मार्च १९०८ मध्ये अमेरीकेतील न्युयॉर्क येथे हजारो स्ञियांनी निदर्शने केली. तेथील स्ञी कामगारांनी केलेल्या ऐतिहासीक कामगीरीच्या स्मरणार्थ ८ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.शितल मेश्राम म्हणाल्या की, मुलींनी स्वत: सक्षम बनले पाहीजे.स्ञियांनी पुरूषसत्ताक व्यवस्थेमध्ये स्वत:चे अस्तित्व स्वतंञ मानसीकतेने तयार करण्याची गरज आहे.महिला सक्षमीकरण म्हणजे स्ञियांना सर्व हक्क / अधिकार पुरूषांच्या बरोबरीने मिळणे एवढेच नव्हे तर स्ञियांना मानसिक प्रबळ स्वातंञ्य मिळणे होय असे मत मांडले.संचालन श्रीकांत लुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन आकाश चौबे यांनी मानले.यशस्वीतेकरीता प्रविण रंगारी, देवेंद्र राऊत, रोहीत मांडवकर , शिवम रामटेके , प्रथम बगमारे, आदित्य राऊत, किरण मेश्राम, काजल कोहाट, श्रद्धा टेंभुर्णे , प्रियंका भोवते , स्नेहल दिवठे, राहुल भुते  व अन्य  विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.