खा. पटेलांच्या प्रयत्नाने ‘हमसफर एक्सप्रेस’ला गोंदियात थांबा

0
23

गोंदिया,दि.09 : नागपूर – बिलासपूर या लोहमार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक वर्दळीच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहे. त्यातही इंदूर-पुरी-इंदूर गाडी क्र.१८३१७-१८ या हमसफर रेल्वेगाडीचा गोंदियात थांबा नव्हता. दरम्यान प्रवाशांकडून थांबाची मागणी करण्यात आली. या बाबीसाठी खासदार प्रफुल्ल पटेल व खा. मधुकर कुकडे यांनी रेल्वे मंत्रालयाला पाठपुरावा केला. परिणामी, रेल्वे मंत्रालयाने हमसफर रेल्वेगाडीचा थांब्याला मंजुरी दिली आहे. मंजुरीचे पत्रदेखील (दि.७) संबंधित झोनल कार्यालयाला पाठविण्यात आले आहे.
गोंदिया रेल्वे स्थानक दक्षिण-पूर्व-मध्ये रेल्वे या झोनच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहे. गोंदिया – रायपूर या लोहमार्गावर धावणाठया सर्वच रेल्वेगाड्या गोंदिया रेल्वे स्थानकावर थांबतात. मात्र, हमसफर रेल्वेगाडीचा थांबा गोंदियाला देण्यात आला नव्हता. त्यामुळे अनेक प्रवाशांना या बाबीचा त्रास होत होता. परिणामी, रेल्वे प्रवासी संघटनांच्यावतीने हमसफर रेल्वेगाडीचा थांबा गोंदियात देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. खा. पफुल्ल पटेल व खा. मधुकर कुकडे यांनी यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाशी पाठपुरावा केला. रेल्वे मंत्रालयाने मागणी मान्य करीत (दि.७) हमसफर रेल्वेगाडीच्या गोंदिया येथील थांब्याला मंजुरी प्रदान केली आहे. यामुळे प्रवाशांनी तथा गोंदिया जिल्हावासीयांनी खा. प्रपुष्ठल्ल पटेल यांचे आभार मानले आहे.