महिलांनी अत्याचाराविरोधात संघटित झाले पाहिजे– तारा हेडाऊ

0
15
मोहाडी, दि. ०९ :  : महिलांनी आपल्या बरोबरच समाजातील इतर स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात संघटित होऊन समोर आले पाहिजे, असे मत मोहाडी पंचायत समिती येथील महिला समुपदेशक केंद्राचे समुपदेशिका तारा हेडाऊ यांनी व्यक्त केले. त्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती येथे महिला दिना निमित्त बोलत होते.
आज समाजात महिलांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रचंड संधी आहेत. उत्पादीत मालाला बाजारपेठही उपलब्ध आहे. त्यामुळे महिलांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळून सचोटीने उद्योग क्षेत्रात पुढे आले पाहिजे. स्वतःला प्रामाणिकपणे झोकून दिल्यास आवडेल त्या श्रेत्रात यश संपादन करता येते. चार महिला एकत्र येऊ शकत नाहीत आणि आल्या तर त्या एकत्र राहू शकत नाहीत अशी भावना आहे. पण महिलांनी आपल्या बरोबरच समाजातील इतर स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात संघटितपणे समोर आले पाहिजे. महिलांवर होणारे अत्याचार जेव्हा थांबतील तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करता येईल, असे प्रतिपादन महिला समुपदेशक केंद्राचे समुपदेशिका तारा हेडाऊ यांनी व्यक्त केले.