पोवार महिला समितीच्यावतीने महिला दिवस उत्साहात 

0
12

गोंदिया,दि.१०: पवार प्रगतीशील मंच गोंदिया अंतर्गत येत असलेल्या पवार महिला समितीच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील ७० वर्ष पूर्ण झालेल्या महिलांचा व वरिष्ठ पदावर पोहोचलेल्या महिला अधिकाèयांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या महिला जेलर सरिता बघेले (पारधी) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाघाट येथील डॉ. रागिनी पारधी या होत्या. वरिष्ठ समाजसेविका शांताबाई रहांगडाले यांच्यासह ७०च्या वर वरिष्ठ महिलांचा यावेळी शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. विचार मंचावर सभापती माधुरी हरिणखेडे, संध्या राणी बिसेन, एकता चव्हाण, विना बिसेन, सेवानिवृत्त प्राचार्य शारदा पटले, मिरा पटले उपस्थित होते.