महिलांना फक्त चुल आणि मुल न करता सर्व क्षेत्रात अग्रभागी राहण्याचे आव्हान केले -ललिता पालकर

0
79

राजभक्षर जमादार,तासगाव-दि.12ःःजरंडी येथील अशोकनगर जिल्हा परिषद शाळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या .कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद शाळा जरंडी च्या मुख्याध्यापिका भक्तीप्रिया जाधव या होत्या त्याच बरोबर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ललिता पालकर सरपंच जरंडी या होत्या .
कार्यक्रमाची सुरूवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजनाने झाली.कार्यक्रमाचे प्रास्तविक अशोकनगर शाळेच्या मुख्याध्यापिका सविता मोहन माने यांनी केले. शाळेच्या स्थापनेपासून शाळेच्या प्रगतीची वाटचाल स्पष्ट केली,

विद्यार्थीनींनी विविध थोर महिला यांच्या वेशभूषा केल्या होत्या .यामध्ये जिजाऊ, सावित्रीआई फुले, झाशीची राणी ,मदर तेरेसा,आनंदीबाई जोशी,किरण बेदी अशा भूमिका साकारण्यात आल्या होत्या . आरती काळे व समिक्षा शिंदे या विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले. फक्त मुलींवर अॉपरेशन केल्या बद्दल.लतिका संतोष शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.ललिता पालकर यांनी विद्यार्थी प्रगती बाबत समाधान व्यक्त करत महिलांना फक्त चुल आणि मुल न करता सर्व क्षेत्रात अग्रभागी राहण्याचे आव्हान केले.तसेच भक्तिप्रिया जाधव यांनी थोर महिलांच्या कार्याचा आढावा घेत महिलांमध्ये प्रेरणा निर्माण केली. व या नंतर संगीत खुर्ची, पाणी भरणे तसेच रिंग पासिंग असे महिला पालकांचे खेळ घेण्यात आले.
विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे वाटप करण्यात आली. यावेळी व्यवस्थापन अध्यक्षा धनश्री शिंदे ,वर्षाराणी काळे , अंगणवाडी सेविका सविता यादव,प्राजक्ता राजमाने,दिपाली खाडे ,सविता जोशी ,सरीता काळे ,पूनम मंडले,स्वाती मंडले ,माया मंडले ,नंदा मंडले ,रेश्मा मंडले ,रेखा मंडले,आशाराणी मंडले , कमल काळे या उपस्थित होत्या .माता पालकांसाठी अल्पोपहाराची सोय दिपाली खाडे यांनी केली .अनिल पालकर ,विजय जाधव ,सूर्यकांत काळे यांचे सहकार्य लाभले .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कृतीशील शिक्षक विशाल खाडे यांनी केले .तर आभार सविता माने यांनी मानले