मुख्य बातम्या:

भांडूपची ऋतुजा राणे ‘अप्सरा आली’ रियालिटी शोची उपविजेती

शेखर चंद्रकांत भोसले, मुलुंड पूर्व., दि. १२ : :- झी युवा चँनेलच्या ‘अप्सरा आली’ या रियालिटी शोच्या अंतिमफेरीमध्ये सर्व अप्सरांमध्ये लहान असलेली व आपल्या परफॉर्मन्सने सगळ्यांना थक्क करणारी भांडूपची ऋतुजा राणे उपविजेती ठरली आहे. ऋतुजाच्या कौतुकास्पद कामगिरीची भांडूपमध्ये सर्वत्र प्रशंसा केली जात आहे व तिच्या अभिनंदनाचे भांडूपमध्ये बँनर लावण्यात आले आहेत.वयाच्या पहिल्याच वर्षी स्टेजवर पहिल पाऊल ठेवलेली ऋतुजा ठाण्यातील बेडेकर कॉलेजमधे BMM च्या पहिल्या वर्षात शिकत आहे आणि गेली सलग १३ वर्ष कथ्थक शिकत आहे. डान्समधे लावणी, फोक डान्स, वेस्टन डान्समध्ये सुध्दा ती पारंगत आहे.
आजपर्यत नेशनल स्पर्धेत दोन वेळा विजेती ठरलेल्या ऋतुजाने राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये देखील विजय संपादन करीत मानांकन प्राप्त केलेले आहे तसेच अनेक कॉलेज फेस्ट मध्ये सौंदर्यवती स्पर्धत विशेष उल्लेखनीय कामगिरी देखील केली आहे. त्याच सोबत एकांकिका स्पर्धेत भाग घेवून उत्कृष्ट अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. ऋतुजाची आई प्राची राणे या देखील एक उत्तम कोरीयोग्राफर आहेत.
Share