शिवसेनेची महाराष्ट्रातील संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर

0
15

मुंबई(विशेष प्रतिनिधी)दि.13 :– लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याची लगबग सुरु केली आहे.काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील काही उमेदवारांची नावे जाहिर करुन आघाडी घेतलेली असतानाच शिवसेनेने सुध्दा आज आपल्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. युती झाल्यानंतर राज्यातील ४८ जागांपैकी भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवणार आहे,त्या संभाव्य उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे

1) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत, 2) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे, 3) उत्तर पश्चिम – गजानन किर्तीकर , 4) ठाणे – राजन विचारे, 5) कल्याण – श्रीकांत शिंदे, 6) पालघर – श्रीनिवास वनगा, 7) रायगड – अनंत गिते, 8) रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत, 9) कोल्हापूर – संजय मंडलिक, 10) हातकणंगले – धैर्यशिल माने, 11) नाशिक – हेमंत गोडसे, 12) शिर्डी – सदाशिव लोखंडे, 13) शिरुर – शिवाजीराव आढळराव-पाटील, 14) औरंगाबाद – चंद्रकांत खैरे, 15) यवतमाळ-वाशिम – भावना गवळी, 16) बुलढाणा – प्रतापराव जाधव, 17) रामटेक – कृपाल तुमाणे, 18) अमरावती- आनंदराव अडसूळ, 19) परभणी- संजय जाधव यांचा समावेश आहे.तर 20) मावळ – श्रीरंग बारणे, 21) उस्मानाबाद – रवी गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब व्हायला आहे.त्यामध्येच शिवसेनाप्रमुखांनी 22) सातारा – पुरुषोत्तम जाधव आणि नरेंद्र पाटील यांच्यात चुरस, 23) हिंगोली – हेमंत पाटील आणि जयप्रकाश मुंदडा यांच्यात चुरस असल्याने येथील नावाची घोषणा थांबवली आहे.