राज्यात बसपा स्वबळावर लोकसभेच्या जागा लढणार-प्रदेश प्रभारी प्रमोद रैना

0
17

गोंदिया,दि.13ः–महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा बहुजन समाज पार्टीच्या वतीने लढविल्या जाणार असून एक दोन दिवसात सर्व उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.सोबतच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातही पक्ष ताकदीने उतरणार असल्याची माहिती बसपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांनी दिली.त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश बसपा अध्यक्ष सुरेश साखरे, प्रदेश प्रभारी अ‍ॅड.संदिप ताजने,कृष्णा बेले,प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार,प्रदेश महासचिव जितेन्द्र म्हैसकर,पूर्व विदर्भ प्रभारी उषाताई बौद्ध,प्रदेश सचिव पंकज वासनिक,दिनेश गेडाम,जिल्हा प्रभारी पंकज यादव,बसपा जिल्हाध्यक्ष धुर्वास भोयर उपस्थित होते.

मागील ८ महिन्यापासून ते राज्यात असून संपूर्ण ४८ लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी भेटून त्यांचे विचार जाणून घेत निवडणुक लढविण्याची तयारी करण्यात आली असून समविचारी पक्षाच्या मताचे विभाजन होऊ नये यासाठी सुध्दा प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. प्रदेश प्रभारी अ‍ॅड.संदीप ताजने यांनी डॉ.बाबासाहेब यांचा विचारावर चालणारा बसपा एकमेव पक्ष आहे. कालपर्यंत पायी फिरणारे आज इन्होवा व हॅलिकॉप्टरमध्ये फिरून दलिताची मते विभाजित करण्यासाठी कसे प्रयत्नशील आहेत ही बाब जनतेला सांगण्याची गरज नसल्याचे म्हणाले.डाॅ.प्रकाश आंबेडकर हे सत्ताधारी पक्षाचे बाहुले असून वंचित आघाडीच्या नावावर जनतेची दिशाभूल करीत असल्याची टिका केली. गोंदिया-भंडारा लोकसभा मतदार संघासाठी ७ उमेदवारांनी अर्ज केला असून येत्या एक दोन दिवसात योग्य उमेद्वाराची राष्ट्रीय अध्यक्षा मायावती घोषणा करणार असल्याचेही ताजने यांनी सांगितले