मुख्य बातम्या:

वायरल मॅसेजमुळे ८ वर्षानंतर मिळाले कुटुंब

भंडारा,दि.14ःः सध्या सोशल माध्यमांद्वारे समाजाचे आरोग्य बिघडविण्याचे काम जोमात सुरू आहे. आलेल्या मॅसेजची कोणतीही खातरजमा न करताना पुढे फॉरवर्ड करण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. परंतु, समाजमाध्यमांवर आलेला असाच एक मॅसेज पुढे फॉरवर्डकेल्याने एका आईला ८ वर्षांपासून बेपत्ता असलेला मुलगा सापडला आहे. इतक्या वर्षानंतर मुलाला बघताच तिचे अर्शू अनावर झाले होते.
पवन शेखर पाटील रा. इमामवाडा नागपूर असे या मुलाचे नाव आहे. सन २0११ मध्ये तो साधारणत: पाच वर्षांचा असताना आईने बेलन्याने मारल्याने तो घरून पळून गेला होता. त्यानंतर तो थेट रेल्वे गाडीत बसून अमरावती येथे पोहोचला. अमरावती येथे काही लोकांनी त्याची विचारपूस केली असता त्याला पत्ता सांगता आले नव्हता. फक्त आई आणि भावाचे नाव सांगत होता. त्यामुळे त्याला अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील बाल संरक्षण गृहात ठेवण्यात आले होते.
इकडे, मुलगा सापडत नसल्याने पवनच्या आईने इमामवाडा पोलिसात तक्र ार दाखल केली होती. दरम्यान, अमरावती येथे इतक्या वर्षानंतरही पवनच्या कुटुंबियांचा शोध लागला नसल्याने २६ फेब्रुवारी २0१९ रोजी त्याला भंडारा येथील बालसंरक्षण कक्षात पाठविण्यात आले. बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी नितीनकुमार साठवणे यांनी पवनच्या कुटुंबीयांबाबत माहिती संकलित करण्याचे ठरविले. त्यानंतर त्यांनी पवनच्या जुन्या फोटोसह संपूर्ण उपलब्ध असलेली माहिती समाजमाध्यमांवर वायरल करुन पवनच्या कुटुंबीयांबाबत माहिती कळविण्याचे आवाहन केले. तथापी, ही पोस्ट वायरल होत नागपूर येथील इमामवाडा पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यांनी लगेच त्यांच्याकडे हरवलेल्या मुलाच्या तक्र ार शोधून काढली. तेव्हा पवन हा आपल्याच परिसरातील असल्याचे स्पष्ट झाले. लगेच पवनच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावून शहानिशा करून घेतली. त्यानंतर हरविलेला मुलगा पवन हा इमामवाडा परिसरातील असल्याचे नितीन साठवणे यांनाभ्रमणध्वनीवर सांगण्यात आले..

Share