अतिक्रमण करून दुकान थाटणार्याविरुद्ध उगारला कारवाईचा बडगा

0
44

*मुख्याधिकारी डॉ कुलभुषन रामटेके यांची धडक मोहिम*

*अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले*

देसाईगंज दि १४ःःवारंवार सुचना देऊन ही दररोज भरत असलेल्या दुर्गा मंदिरासमोरिल खुल्या मैदानात सकाळच्या गुजरीत मनमानी करुन बाजारपेठ कंत्राटदाराला न जुमानता मुख्य रस्त्यावर आलु लसन कांद्याचा दुकान थाटुन वाहतूकीला अडथळा निर्माण करणार्य्रा दुकानदारांवर देसाईगंज नगरपरीषदचे मुख्याधिकारी डॉ कुलभुषन रामटेके यानी आज(दि.14) सकाळीच कारवाईचा बडगा उगारुन रस्त्यावर अतिक्रमण करून दुकान थाटणार्य्राविरुद्ध तातडीने कारवाई केल्याने अतिक्रमणधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.13 मार्च रोजी बेरार टाईम्सने या रस्त्यावर अतिक्रमण करुन व्यवसायिकांनी दुकान थाटल्यासंबधीचे वृत्त प्रकाशित केले होते.त्यानंतर नगरपरिषद प्रशासन जागे होत कारवाईचा धडाका सुरु केला आहे.
देसाईगंज शहर हे परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असुन मातावार्डातील दुर्गा मंदिरासमोरिल खुल्या जागेवर दररोज आजुबाजुला शेतकरी शेतात काढत असलेल्या भाजीपाला ठोक दराने सकाळी सात ते साडे अकरा च्या सुमारापर्यंत विक्री केल्या जाते. या ठिकाणाहुन घेतलेला भाजीपाला आजुबाजुच्या ठिकाणी भरत असलेल्या आठवडी बाजारपेठ मध्ये विक्री केल्या जाते.
परंतु, देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठ मध्ये आलु, लसन, कांद्याचा व अद्रक संदर्भात स्वतंत्र बाजारपेठ असतांना देखिल या ठिकाणचे काही व्यापारी दुर्गा मंदिरासमोरिल खुल्या जागेवर आपला दुकान न थाटता, नगरपरीषद शॉपींग सेंटर बँकेकडे जाणार्य्रा मुख्य वाहतूकीच्या मेनरोडवर रस्त्यावर अतिक्रमण करून सकाळी सात  पासुन दुपारी बारा वाजेपर्यंत वाहतूकीला अडथळा करीत होते.तसेच परिसरातील जनतेला सकाळी विद्यार्थांना ने — आण करणार्य्रा शाळेच्या बसेस व खाजगी वाहने काढताच येत नसल्याने अनेकदा लेखी व मौखिक तक्रारी केल्या होत्या. त्याकडे नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करीत होते.त्यातच बेरार टाईम्सने हे वृत्त प्रकाशित करताच नगरपरिषद प्रशासनाचेही धाबे दणादणाले व आज सकाळी कारवाईला सुरवात केली.
नगर परिषद देसाईगंजच्यावतीने अतिक्रमण करणार्य्रा व्यापार्य्रांवर कायदेशिर कारवाई करावी व दररोज वाहतूकीला निर्माण होत असलेला अडथळा दुर करुन परिसरातील जनतेला होणारा त्रास कमी व्हावा हे नव्यानेच रुजु झालेले मुख्याधिकारी डॉ कुलभुषन रामटेके यांच्या निदर्शनास येताच नगरपरीषदचेच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन संपुर्ण अतिक्रमण काढुन टाकण्यात आले.या धडक मोहिमेमुळे शहरातील अतिक्रमणधारक चांगलेच हादरले असुन लोकसभा निवडणुकीसाठी सुरु असलेल्या आचारसंहितेतच स्त्याच्या दुतर्फा पसरलेल्या अतिक्रमणावर बुलडोजर चालण्याची दाट शक्यता वर्तविल्या जात आहे.