भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार-आंबेडकर

0
52

अकोला,दि.14- ‘भारिप बहुजन महासंघ’ आता वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार असल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज गुरुवारी केली. भाजपच्या दबावाचे राजकारणामुळे देशभरात काँग्रेसची कुणासोबतही युती होत नाही. काँग्रेसची कुणासोबतही युती होऊ नये, यासाठी भाजप ब्लॅकमेलिंग करत असल्याचा घणाघाती आरोपही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केला.

अकोल्यात निवासस्थानी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, काँग्रेेस अध्यक्ष राहुल गांधी कुणाशीही समजोता करू शकले नाही. मलासुद्धा पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात आरोपी करण्याचा प्रयत्न झाला होता. याचा त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. नितीन गडकरींच्या विरोधात नाना पटोले डमी उमेदवार देण्यात आले आहे. जमीन घोटाळ्यात संपूर्ण गांधी कुटुंब आहे. हे आताच भाजप नेत्या स्मृती इराणी यांचे जनतेसमोर सांगितले आहे. म्हणजे तुमचा जेलचा रस्ता मोकळा आहे, हे ब्लॅकमेलिंगचे राजकारण सुरू आहे, कारण हा आरोप यापूर्वी मी केला होता.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी निश्चितच सक्षम पर्याय म्हणून समोर येणार असल्याचा आंबेडकरांनी विश्वास व्यक्त केला. या निवडणुकीचे निकाल काहीही असो, आमचा पुढचा प्रवास हा वंचित बहुजन आघाडी याच बॅनर खाली होईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.