मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

नागपूर, रामटेकसाठी 4382 मतदान केंद्रे

नागपूर,दि १४ःः – नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदानासाठी चार हजार 382 केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 18 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी पत्रकार परिषदेत दिली.मुद्‌गल म्हणाले की, रामटेक मतदारसंघात 2345 तर नागपूर मतदारसंघात 2037 मतदार केंद्रे आहेत. 82 मतदार केंद्रे संवेदनशील आहेत. यात 52 केंद्रे शहरात तर 30 केंद्रे रामटेक लोकसभा मतदारसंघात आहे. सर्वच मतदारसंघात “व्हीव्हीपॅट’ची (मतदान केल्याची पावती) सोय करता येणार नसली तरी जिल्ह्यातील दोन्ही मतदार “व्हीव्हीपॅट’ उपलब्ध असेल. नागपूर जिल्ह्याला लागून मध्य प्रदेशची सीमा आहे. निवडणुकीच्या काळात मध्य प्रदेशातून नागपूर जिल्ह्यात दारूचा पुरवठा होता कामा नये किंवा मतदानाच्या दिवशी तिकडील लोक या भागात येता कामा नये, यासाठी सीमवेर अतिरिक्त सुरक्षा ठेवण्यात येईल. तसचे विशेष पथक नियुक्त करण्यात येणार आहे.

Share