मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आंतरराज्यीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक

गडचिरोली,दि.14: लोकसभा निवडणुक 2019 च्या पार्श्वभुमीवर नक्षलग्रस्त भागातील जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांची महत्वपुर्ण बैठकीचे  आयोजन करण्यात आले होते.  या बैठकीला छत्तीसगड, तेलंगणा आणि  छत्तीसगडमधील लगतच्या जिल्ह्यांचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेष बलकवडे यांनी सादरीकरणाव्दारे तपशिलवार माहिती अवगत करुन दिली.  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रशासनाची तयारी बाबत माहिती देऊन नक्षली कारवायात नागरिकांची विनाकारण हत्या होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनानी सतर्क राहावे असे सुचित केले. 
ही बैठक  पोलिस उप महानिरिक्षक अंकुश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधिक्षक शैलेष बलकवडे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुनाल खेमनार, गोंदया जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे,  राजनांदगावचे जिल्हाधिकारी रोहीत व्यास, भंडारा जिल्हाधिकारी शंतनुकुमार गोयल,  जयप्रकाश मोर्या, चंद्रपूरचे पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी, मंचेरीयलचे अतिरिक्त पोलिस कमिश्नर महमद गोरसे बाबा, आसिफाबादचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. पी. राम बाबा, पाखांदूरचे अतिरिक्त पोलिसअधिक्षक राजेंद्र जयस्वाल, राजनांदगाव पोलीस अधिक्षक कमलोचन कश्यप, भोपालपटनमचे  एसडीपीओ  पितांबर पटले, के. स्वर्णलता, गोंदिया पोलिस अधिक्षक विनिता साहू, अतिरिक्त पोलिस अधिक्षक भंडाराचे  रश्मी नांदेडकर, उपजिल्हाधिकारी ए.के. माझी, अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वर्णलता के., एसडीएम नागेश, अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, अपर जिल्हाधिकारी कुळमेथे , निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ, नायबतहसिलदार सुनिल चडगुलवार प्रामुख्याने उपस्थित होते.
नक्षलप्रभावित चारही राज्यातील लोकसभा मतदार संघात एकाचवेळी पहिल्या टप्यात मतदान होणार आहे. त्यामुळे  निवडनुकीदरम्यान नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया आळा घालून सर्व ठिकाणची निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडावी यासाठी कोणते उपाय करता येतील यावर चर्चा करण्यासाठी  सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
Share