मुख्य बातम्या:
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करा-विभागीय आयुक्त पीयूष सिंह# #मेंढे यांच्या मूळगावासह मतदारसंघात कार्यकर्त्यांनी साजरी केली दिवाळी# #अंकुश शिंदे सोलापूरचे नवीन पोलीस आयुक्त, तर एम. बी. तांबडें नवे नक्षलचे पोलीस उपमहानिरिक्षक# #जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जूनला मतदान# #कवयित्री पंचवटी गोंडाळे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान# #वंचित बहुजन आघाडीमुळे दोन माजी मुख्यमंत्र्याना पराभवाचा फटका# #५0 हजारांची लाच स्वीकारणार्‍या मंडळ अधिकार्‍याला अटक# #निशुल्क एकदिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम# #भारतीय सैन्यात महिला सैनिक पोलीस भरती# #खासदार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान

सोशल मिडीयावर ‘वाशिम सायबर’ची करडी नजर

वाशिम, दि. १४ :  जिल्हा पोलीस दल लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोशल मिडीयाच्याबाबतीत सतर्क झाले असून त्यांची यावर करडी नजर आहे. माहिती तंत्रज्ञानाचे सध्याचे हे जग असल्याने सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. सोशल मिडीयाचा वापर विविध पक्षांचा प्रचार करण्यासाठी केला जातो. त्या संबंधाने तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या ऑनलाईन गुन्हेगारीवर सायबर पेट्रोलिंगद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे.

वाशिम पोलीस सायबर सेलच्या माध्यमातून अशा प्रकारचे सायबर गुन्हे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. पक्षाच्या उमेदवाराकडून सोशल मिडियाचा प्रभावी वापर करत प्रचार सुरु करण्यात आला आहे. दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर करून करण्यात येणाऱ्या गुन्हाच्या संख्येत वाढ होत आहे. फ्रॉड मेल, धमकी देणारा मेल, ऑनलाईन फसवणूक, फिशिंग, बनावट फेसबुक अकौंट, फेसबुक अकौंट हॅक करणे, डेटा थेफ्ट, सायबर स्कॉटिंग, हॅकिंग सारख्या गुन्ह्यांवर तपास करून गुन्हेगारांना गजाआड करण्यासाठी वाशिम सायबर सेल सज्ज आहे.

नागरिकांनी याद्वारे सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट न टाकण्याचे, योग्य व सुरक्षितरित्या सोशल मिडियाचा वापर करणे, आपल्याकडून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक आचारसंहिता भंग होईल, अशी कोणतीही पोस्ट पुढे पाठवू नये, तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून अफवा पसरवू नये. सायबर सेल वाशिम पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील सर्व व्हॉटसअप ग्रुपवर करडी नजर ठेवण्यात आली असून सर्व नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांनी केले आहे.

Share