मुख्य बातम्या:

सोशल मीडियावर भावना गवळीसंदर्भात आक्षेपार्ह ‘पोस्ट’; आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल

वाशिम,दि.१४ः-यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यासदंर्भात सोशल मीडियावर  आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी १४ मार्च रोजी कारंजा येथील एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवेक नाकाडे रा. मंगरुळपीर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली की, फिर्यादी हे त्यांचा मित्र जुबेर मोहनावाले याने खासदार भावना गवळी यांच्यासंदर्भात फेसबुकवरील पोस्ट, कमेन्ट पाहत असताना आरोपी साद पठाण रा. कारंजा लाड याने गवळी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केली. या तक्रारीवरून आरोपी पठाण याच्याविरुद्ध मंगरूळपीर पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६७ तसेच भा. दं. वि. कलम ५०१ नुसार गुन्हा दाखल केला.

Share