मुख्य बातम्या:

बाळापूरजवळील मोटारसायकल अपघातात सरपंचाचा मृत्यू 2 जखमी

नागभीड,दि.17ःः चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातंर्गत येत असलेल्या बोंड बाळापूर रस्त्यावरील चिपी आंबा फाट्यावर दोन मोटरसाकलमध्ये झालेल्या आमारासमोरच्या अपघातात १ जण मृत पावला असून २  जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली.मृत व्यक्तीचे नाव पंढरी श्रावण नवघडे,(वय ३६ सरपंच देवटक) असे आहे. तर जखमीमध्ये समीर खेकडे(वय ३२ उपसरपंच देवटक) हे दोघेही सुपारीच्या व्यवसायानिमित्ताने बाळापुर ( बु) ला जात होते.दरम्यान विरुध्द दिशेने येणार्या पल्सर चालकाने धडक दिली.यात पल्सरचालक आकांत मधुकर शेंडे (वय २७ रा. बोंड)हा दारुच्या नशेत असल्याचे उपस्थितांचे म्हणने आहे.त्याला गंभीर जखमीवस्थेत रुग्णालयात हलविण्यात आले.आकांतचे येत्या २८ मार्चला लग्न होणार आहे.पोलीसांनी घटनास्थळी पोचून पंचनामा करीत मृतदेह रुग्णालयात हलविले.

Share