मुख्य बातम्या:

अमरावतीत युवा स्वाभीमानच्या नवनीत राणा आघाडीच्या उमेदवार

अमरावती(विशेष प्रतिनिधी),दि.17ः –  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 11 एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदारसंघातील उमेदवार यादी जाहीर होऊ लागल्या आहेत.यात अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस -राष्ट्रवादीच्या आघाडीकडून युवा स्वाभीमानचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या युवा स्वाभीमानच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला राष्ट्रवादीकडील अमरावतीची जागा सोडण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला आहे.त्या निर्णयाला अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादीने ईमानेइतबारे साथ दिल्यास ही जागा शिवसेनेच्या हातून जायला वेळ लागणार नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणने आहे.2०१४ च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून  आनंदराव अडसूळ यांचा १ लाख ३६ हजार मतांनी विजय झाला होता. त्यांनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा-कौर यांचा १३७९३२ मतांनी पराभव केला होता.त्यानंतर नवनीत राणा या मतदारसंघात सातत्याने मतदारांच्या संपर्कात राहिल्या असून मेळघाटातील आदिवासींचे प्रश्न असो की महिलांचे त्यासाठी सदैव कार्यरत राहिल्याची त्यांची जमेची बाजू आहे.परंतु राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले खोडके यांच्याशी मात्र राणा यांचे असलेले मतभेद हे निवडणुकीत राणांच्या बाजूने येतील काय हा प्रश्न निरुत्तर आहे.

युवा स्वाभिमान पक्षाकडूनच ही निवडणूक लढणार असल्याचे रवी राणा यांनी स्पष्ट केले. अनेक दिवसांपासून रवी राणा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक होती. मात्र शिवसेना-भाजप युती जाहीर झाल्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळे भाजपशी फारकत घेत रवी राणा पुन्हा आघाडीत आले आहेत. या मतदारसंघासाठी अनेक दिवसांपासून नवनीत राणा यांनी तयारी सुरु केली होती. मतदारसंघात ठिकठिकाणी महिला मेळावे, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन नवनीत राणा यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सोशल मिडीयामध्ये नवनीत राणा यांचे कार्यकर्ते  “जनतेशी आघाडी माझी, जनतेशी माझी युती, जनता जनार्दन पाठीशी, मग काय कुणाची भीती”, “जीत पक्की, टी.व्ही. नक्की” असे संदेश व्हायरल करताना दिसत आहेत.

उमेदवार पक्ष मिळालेली मते
नवनीत राणा-कौर राष्ट्रवादी ४,६७,२१२
आनंदराव अडसूळ शिवसेना ३,२९,२८०
डॉ.राजेंद्र गवई रिपई ५४,२७८
मतदानाची टक्केवारी ६५.००% (५१.००%)
Share