ब्रह्मपुरीत हास्य कविसंमेलन व कविता संग्रहाचे आज प्रकाशन

0
15

ब्रह्मपुरी ,दि.23ःः धुळीवंदनानिमित्त येथील झाडीबोली साहित्य मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई, शाखा ब्रह्मपुरीच्या संयुक्तवतीने आज शनिवारला (दि.२३)दुपारी २ वा.वडसा रोडवरील स्वागत मंगल कार्यालयात हास्य कविसंमेलन आणि कवी डॉ. धनराज खानोरकर यांच्या ‘मास्तर मातीचे’ कवितासंग्रहाचा लोकार्पण व कवी अमरदीप लोखंडेंच्या ‘खरे तेच बोलतो! ‘या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा साजरा होत आहे.
अध्यक्षस्थानी ब्रह्मपुरीतील उपविभागीय अधिकारी क्रांती डोबे राहणार असून, तहसीलदार विद्यासागर चव्हाण उद््घाटन करतील. प्रमुख अतिथी म्हणून, प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे, पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्‍वर, जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, नगराध्यक्ष रिता उराडे, उपनगराध्यक्ष अशोक रामटेके, शिक्षणाधिकारी शरदचंद्र पाटील, प्रा. प्रभूजी ठाकरे, नेताजी मेर्शाम, योगिराज वेलथरे, पं. स. उपसभापती विलास उरकुडे उपस्थित राहणार असून, यावेळी चिमूरचे कवी सुरेश डांगे यांच्या अध्यक्षतेखाली ‘हास्य कविसंमेलन ‘रंगणार आहे.
हास्य कविसंमेलनात वसंता चौधरी, आनंद बोरकर, रोशनकुमार पिलेवान, नरेशकुमार बोरीकर, मुन्नाभाई नंदागवळी, गजानन माद्येश्‍वर, संजय येरणे, तनूजा बन्सोड, भीमानंद मेश्राम, सुरेंद्र इंगळे आणि झाडीबोली मंडळातील व पत्रकार संघातील मान्यवर कवी आपला सहभाग नोंदविणार असून, सहभागी कविंना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.नागरिकांनी मोठय़ा संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. रवी रणदिवे, सचिव गुरुदेव अलोणे, झाडीबोली शाखेचे अध्यक्ष अमरदीप लोखंडे, सचिव डॉ. मंजूषा साखरकर व सदस्यांनी केले आहे.