बाहेकर व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनमुक्त होळी

0
16

गोंदिया,दि.23 : श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदिया द्वारा संचालित बाहेकर व्यसनमुक्ती केंद्र ,कुडवा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा व्यसनमुक्त होळी साजरी करण्यात आली.होळीसारख्या पवित्र सणाला व्यसन एक कलंक आहे. या व्यसनामुळे अनेक लोकांचे घर उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहेत. आजचा युवा वर्गसुद्धा व्यसनाकडे वळत आहे. तेव्हा व्यसनमुक्त होळीच्या माध्यमातून समाजप्रबोधन व्हावे. यासाठी व्यसनमुक्त होळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अथिती म्हणून जगजितसिंग हे होते. दुलीचंद ठाकूर, बाहेकर व्यसन मुक्ती केंद्राचे संचालक विजय बाहेकर उपस्थित होते. यावेळी जगजितसिंग यांच्या हस्ते व्यसनमुक्त होळी जाळण्यात आली. सर्वांना गुलाल लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या व अल्कोहोलिक ऐनानम्स गोंदियाद्वारे नाईट विसन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात झाली. यावेळी आपले विचार मांडताना जगजितसिंग यांनी मनुष्याने प्रथम हे मान्य केले पाहिजे की आम्ही अल्कोहलपुढे शक्तिहीन आहोत. आपली चूक स्वीकार करुन नेहमी व्यसनमुक्त राहणे काळाची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मनीष मुनेश्वर, नरेंद्र मोगरे ,राधेश्याम मस्के तसेच कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले