मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

भंडारा-गोंदियाः राष्ट्रवादी तर्फे नाना पंचबुद्धे उमेदवारी अर्ज दाखल करणार

भंडारा,दि.25- लोकसभेच्या 2019 सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने भंडाराचे नाना पंचबुद्धे हे आपला उमेदवारी अर्ज आज शेवटच्या दिवशी दाखल करणार आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भंडारा येथील जलाराम सभागृहात राष्ट्रवादीची बैछक सुरू असून या बैठकीकडे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली असल्याची माहिती हाती आली आहे.

राष्ट्रवादीचे वजनदार नेते यांनी या मतदार संघातून माजी आमदार नाना पंचबुद्धे यांनी राष्ट्रवादीचे तिकीट मिळाल्याचे नुकतेच जाहीर केले. या नंतर नामांकन पत्र दाखिल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून राष्ट्रवादी पक्षाने एका बैठकीचे आयोजन स्थानिक जलाराम सभागृहात केले आहे . या बैठकीला खासदार प्रफुल्ल पटेल यांचेसह आमदार प्रकाश गजभिये, सुनील फुंडे, नरेश माहेश्वरी, रमेश डोंगरे, सीमा मडावी. पुरुषोत्तम कटरे, धनेंद्र तुरकर, धनंजय दलाल, आनंदराव वंजारी आदी नेते मंचावर हजर आहेत. या बैठकीमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती नगण्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

Share