कार्यशाळेत मतदान व मतदान जनजागृतीसाठी संकल्‍प

0
17

जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने विविध उपक्रम

नांदेड, दि. 29 :- १७ व्‍या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा टक्‍का वाढविण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने विविध उपक्रम राबविल्‍या जात आहेत. यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयासह प्रत्‍येक विधानसभा मतदार संघात मतदान जनजागृती कक्षाचे स्‍थापना करण्‍यात आली आहे. या अनुषंगाने आज नांदेड येथील कै. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृहात जिल्‍ह्यातील विविध कार्यालयाचे विभाग प्रमुख विस्‍तार अधिकारी, केंद्र प्रमुख व मुख्‍याध्‍यापक यांची कार्यशाळा घेण्‍यात आली. या कार्यशाळेत शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगिर, दिलीप बनसोडे, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी एस. व्‍ही. शिनगे, संतोष कंदेवार, गट शिक्षणाधिकारी अशोक देवकरे , जिल्‍हा क्रिडा अधिकारी राजेश्‍वर मारावार आदिंची उपस्थिती होती.
जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. जिल्‍ह्यातील सर्व शाळांमध्‍ये मतदान जनजागृतीसाठी चित्रकला स्‍पर्धा, रांगोळी स्‍पर्धा,मेहंदी स्‍पर्धा घेण्‍यात येणार आहेत.त्‍याचप्रमाणे सायकल रॅलीसह, प्रभात फे-यांचे नियोजन करण्‍यात आले आहे. मतदान जनजागृतीसाठी स्‍वंयसेवी संस्‍थेसह शाळा स्‍तरावरील एनसीसी,स्‍काऊटगाईडचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
या कार्यशाळेत शेख रुस्‍तुम यांनी मतदान जनजागृतीसाठी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांचे मतदारांना मतदान करण्‍याबाबतची चित्रफित दाखविण्‍यात आली . या कार्यशाळेत उपस्थितांनी मतदान जनजागृती व मतदान करण्‍याबाबत संकल्‍प केला. या कार्यशाळेत मतदान करण्‍यासंदर्भात संतोष कंदेवार यांनी उपस्थितांना शपथ दिली. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी केले, तर सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रलोभ कुलकर्णी यांनी मानले.