मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

गोंदिया इथे नि:शुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

गोंदिया:- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र गोंदिया द्वारा आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे पुरस्कृत अनुसूचित जाति प्रवर्गातील 30 युवक-युवतीना महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र गोंदिया द्वारे एक महीना कालावधीचे उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 25 फेब्रुवारी  ते 28 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाचे समारोपीय कार्यक्रमात माननीय आलोक मिश्रा (विभागीय अधिकारी एम. सी.ई.डी. नागपुर) यानी मार्गदर्शन करताना युवकानी नौकरीच्या मागे न वळता स्वयंरोजगारा कड़े वळुन उद्योग उभारणी विषयी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथि  हृदय गोड़बोले (प्रकल्प अधिकारी बार्टी गोंदिया जिल्हा) यानी बार्टीच्या योजना व उद्योजकाचे व्यक्तिमत्व कसे असावे या विषयावर मार्गदर्शन केले. बी.एम. शिवणकर (उद्योग निरीक्षक जिला उद्योग केंद्र गोंदिया) यानी कर्ज योजना आणि स्वयंरोजगार बद्दल माहिती दिली. यशस्वी उद्योजक थायमो फ्रेश फूड हाइजीन कमर्शियल युकॉन कंपनी नागपुरचे संचालक नीरज चिंचखेडे यानी मार्गदर्शन करताना उद्योग व्यवसायात मार्केटिंगचे म्हत्त्व सांगितले. निलेश भुते ( प्रकल्प अधिकारी एमसीईडी गोंदिया जिल्हा) यानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तत्पूर्वी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आप आपल्या निवडलेल्या उद्योगाविषयी प्रकल्प अहवालाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन राजेश खोब्रागडे (समन्वयक एमसीईडी गोंदिया) यानी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांकडून विनोद नंदागवलीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विशाल मेश्राम, मुकेश नामुजवार ( एमसीईडी गोंदिया) यानी अथक परिश्रम घेतले तर सामाजिक क्षेत्रात नि:शुल्क सेवा देण्यात अग्रणी असलेल्या सविधांन बचाव कृती संघाने स्वयंस्फुर्तीने समोर येऊन सदर प्रशिक्षण कार्यक्रमाला सहकार्य केले.

Share