पंतप्रधान 3 एप्रिलला गोंदियात,रावणवाडी-गोंदियामार्ग 7 तास राहणार बंद

0
20

 गोंदिया,दि.01 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3 एप्रिल रोजी गोंदिया येथे येत आहेत. पंतप्रधान हे बिरसी विमानतळ ते मरारटोली चौक, गोंदिया पर्यंत रोडने प्रवास करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रवासादरम्यान सुरक्षीततेच्या दृष्टीने तसेच गोंदिया शहरात होणारी संभावीत गर्दी लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षीततेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी 3 एप्रिल 2019 रोजी दुपारी 2 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बिरसी विमानतळ रोडपासून मरारटोली सभा स्थळांपर्यंतचा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.यामुळे या रावणवाडी ते गोंदिया मार्ग 7 तास बंद राहणार असून सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.एका निवडणुक सभेसाठी वाहतुक मार्ग बंद करुन जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

प्रतिबंधीत क्षेत्र- बिरसी विमानतळ ते मरारटोली सभा मंडपापर्यंत सर्व वाहनांकरीता 3 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना (पोलीस दलाची वाहने,ॲम्बुलन्स,अग्नीशमन तसेच अत्यावश्यक सेवा वाहने सोडून) वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.पर्यायी मार्ग- बालाघाट ते आमगावकडे येणारे-जाणारे वाहनांना पुढीलप्रमाणे वळविण्यात यावे. कोरणीघाट-चंगेरा-कोचेवाही-बनाथर,छिपीया-भदुटोला-कटंगटोला-वडेगाव-कामठा-पांजरा-कालिमाटी आमगाव. बालाघाट-गोंदिया-तिरोडाकडे येणारे-जाणारे वाहनांना पुढीलप्रमाणे वळविण्यात यावे. कोरणीघाट-जिरुटोला-भादयाटोला-काटी-दासगाव-निलज-पांढराबोडी-जब्बारटोला-कुडवा-वायपाईंट तिरोडा-गोंदिया शहर. आमगाव ते तिरोडाकडे येणारे-जाणारे वाहनांना पुढीलप्रमाणे वळविण्यात यावे. पतंगा चौक (रिंग रोड)-कारंजा टी पाईंट-गोरेगाव-कुऱ्हाडी-बोदलकसा-सुकळी-सुकळी फाटा-तिरोडा. तिरोडा ते बालाघाटकडे येणारे-जाणारे वाहनांना पुढीलप्रमाणे वळविण्यात यावे (जड-अवजड वाहनांसाठी)- सहकारनगर तिरोडा (टी पाईंट)-अवंती चौक तिरोडा (खैरलांजी रोड)-करटी-परसवाडा टी पाईंट-खैरलांजी-बालाघाट. तिरोडा-गोंदिया-गोरेगावकडे येणारे-जाणारे वाहनांना पुढीलप्रमाणे वळविण्यात यावे (हलके वाहन)- तिरोडा रोड रामाणी लॉन-ढाकणी रोड-चुटीया-डव्वा    टी पाईंट-गोरेगावकडे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली आहे.