चेंबरचे झाकण बसविण्याच्या कामात पालिकेची बेपर्वाई

0
22

शेखर भोसले/मुलुंड,दि.01: मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनीच्या नाक्यावर असलेल्या एका सर्विस चेंबरचे झाकण गायब झाले आहे. ते बसवून घ्यावे अशी विनंती करणारे पत्र स्थानिक रहिवाश्यांनी ३१डिसेबंर २०१८ रोजी पालिकेच्या टी वार्ड अधिकाऱ्यांना दिल्यानंतर तब्बल ४५ दिवसांनी पालिकेच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत सदर चेंबरला योग्यप्रकारे झाकण बसविण्याऐवजी व रस्त्याला समांतर बसविण्याऐवजी रस्त्यापेक्षा ६ इंच उंच व सिमेंटच्या साहाय्याने कायमस्वरूपी बसेल असे एक झाकण बसविण्यात आले. परंतु वर्दळीच्या या रस्त्यावरून वाहने जाताना या चेंबरला घासून वाहने जावू लागल्यामुळे योग्य पध्दतीने झाकण न बसविल्याने व हलक्या दर्जाचे सामान वापरल्याने लगेच १ महिन्यात ते झाकण चेंबरपासून वेगळे झाले आहे.त्यामुळे पुन्हा तेथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेच्या या हलगर्जीपणा व निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल रहिवासी प्रचंड संतप्त झाले असून करदायकांच्या पैश्याचा पालिकेकडून अश्या प्रकारे होत असलेल्या अपव्ययाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.