पोलिसांची हुकूमशाही सुरक्षेच्या नावावर 17 तासापुर्वीच बालाघाट टि प्वाईंट बंद

0
13

गोंदिया,दि.02ः- भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा उद्या गोंदियात होऊ घातली आहे.त्यासाठी पोलीस विभागाने कुठला मार्ग कधी व केव्हापासून बंद होईल यासंबधी प्रसिध्दीपत्रकातून माहिती दिली असली तरी सुरक्षेच्या नावावर शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरण्याचे काम सुरु केले आहे.मोदींची सभा ही सायकांळी 6 वाजता असताना 3 एप्रिलच्या दुपारी 2 वाजेपासून म्हणजे 4 तासपुर्वीच रस्ता बंद करण्यात येणार आहे.जनतेला त्रास देणार नाही म्हणणार्यासाठी 4 तासापुर्वी रस्ता बंद करण्याची सुचना दिली.नागरिकांनी त्यालाही स्विकारण्याची मानसिकता तयार केलेली असतानाच गोंदिया पोलीसांनी मात्र आपल्या हुकूमशाही स्वभावाचा व कायद्याच्या धाकावर सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्यास सुरवात केली असून आज मंगळवारला सायकांळी 7.30 वाजनेंतरपासूनच बालाघाट टि प्वाईंटवर रस्ता बंद करण्यासाठी बॅऱिकेटस लावून वाहनधारकांना त्रास देण्यास सुरवात केली आहे.यामार्गावरुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.तर त्याठिकाणी असलेल्या पोलिसांच्या वागणे हे बघून सर्वसामान्य जनतेत रोष दिसून येत आहे.प्रधानमंत्र्याच्या सुरक्षेच्या नावावर मात्र जनतेला वेठीस धरणे कितपत योग्य असा सुर टि प्वाईंटवर उपस्थितांमध्ये एैकावयास मिळाला.