मुस्लिम समाजाचा कुठल्याही उमेदाराला पाठिंबा नाही-खालिद पठाण

0
23

गोंदिया,दि.03- या लोकसभा निवडणूकीत मुस्लिम समाजाने कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही. लोकसभेच्या निवडणूकीत प्रत्येक मुस्लिम बांधवाने मतदान करावे मात्र मत देतांना विवेक बुद्धीने विचार करूनच मत द्यावे.यापूर्वी व्हॉटपअपवरून विधानपरिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांनी मुस्लीम समाजाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला समर्थन जाहीर केल्याचे जाहीर केले आहे,असे कुठलेही समर्थन जाहीर करण्यात आलेले नाही अशी माहिती हॉटेल पॅसिफिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत गोंदिया मुस्लिम समाजाचे प्रमुख खालिद पठान यांनी दिली.या पत्रकार परिषदेला मुस्लिम समाजाचे याकूबभाई पठाण, शकीलभाई मंसुरी,कमरअली भाई,सरफराज गोंडील तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या संदर्भात माहिती देतांना खालिद पठाण यांनी सांगितले की,३१ मार्च रोजी आमदार परिणय फुके यांनी तिगाला यांच्या घरी मुस्लिम बांधवासोबत चर्चा केली व व्हॉटसअपवर फोटोसह माहिती प्रकाशित केली की, मुस्लिम समाजाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला समर्थन करण्यात आले आहे. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही लोकांनीही सांगितले की,अशी चर्चा झालीच नाही मात्र,भारतीय जनता पक्षाच्या वतीने चुकीची माहिती देवून मतदाराची दिशाभूल तसेच आपसात वैमनस्य वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले या घटनेचा याकूबभाई, शकीलभाई, कमरअली भाई, सरफराजभाई यांनीही निषेध केला व सर्व मुस्लिम बांधवानी आपल्या विवेक बुद्धीने मतदान करावे असे आवाहन केले.